शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांसाठी झोकून दिलेला नेता हरपला! - साबडे

By admin | Updated: March 4, 2017 02:16 IST

कामगार नेते दिगंबर सातव यांच्या जाण्याने कामगार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी व्यक्त केले

मुंबई : महापालिका कामगार नेते दिगंबर सातव यांच्या जाण्याने कामगार चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी व्यक्त केले. म्युनिसिपल मजदूर युनियन व संलग्न संघटनांनी ना.म.जोशी मार्ग येथील कै. गोपाळ शेट्टीगार सभागृहात दिगंबर सातव यांची शोकसभा आयोजित केली होती, त्यात साबडे बोलत होते.साबडे म्हणाले की, गेली ५० वर्षे सफाई कामगारांच्या प्रश्नांसाठी सातव यांनी झोकून दिले होते. संयमाने संघर्ष करून आंदोलन कोठे थांबवायचे, याचे अचूक ज्ञान सातव यांना होते. कामगारांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे आणि कामगारांशी बांधिलकी ठेवणारे नेते म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी म्युनिसिपल मजदूर युनियनमधील सातव यांचे सर्व सहकारी नक्कीच भरून काढतील, अशा शब्दांत साबडे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.साफसफाई खात्यातील कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडून त्यांच्या हक्कांसाठी लढणारा माझा सहकारी हरपला, अशा शब्दांत युनियनचे सरचिटणीस अ‍ॅड. महाबळ शेट्टी यांनी सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी युनियनचे कार्याध्यक्ष वामन कविस्कर, अशोक जाधव, उपाध्यक्ष महेश महेडा, कामगार नेते शंकर शेट्टी, ज्येष्ठ कामगार नेते शंकर साळवी आणि अन्य नेत्यांनी सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)