शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
3
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
4
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
5
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
6
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
7
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
8
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
9
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
10
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
11
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
12
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
13
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
14
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
15
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
16
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
17
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
18
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
19
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
20
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट

बेकारीच्या अंधारात पेटविला ‘एलईडी बल्ब’ उद्योगाचा दिवा--जगा वेगळा उद्योजक

By admin | Updated: January 5, 2016 22:46 IST

प्रतिकुलतेला केले चितपट : दोन नोकऱ्या गेल्यानंतर साताऱ्यात स्वत:ची कंपनी काढून दिला इतरांनाही रोजगार

जगदीश कोष्टी--सातारा--घरची बेताचीच परिस्थिती... वडील शेती करत असताना बदली चालक म्हणून खासगी क्षेत्रात काम करत होते... संसाराचा गाडा हाकत असताना वडिलांची होणारी ओढातान न पाहवल्याने त्याने खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. पहिली कंपनी बंद पडली... दुसरीत नोकरी स्वीकारली तिही बंद पडली. मग या तरुणानं धाडस दाखवलं अन् स्वत: चीच कंपनी काढून इतरांना रोजगार दिला आहे. बेरोजगारीच्या अंधारात प्रत्येकजण कोठे ना कोठे नोकरी स्वीकारून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकांना साथही मिळते. सातारा येथील करंजे परिसरात राहत असलेल्या रोहन किर्दत यांच्या बाबतीतही तसेच घडले. महाविद्यालयीन जीवन म्हणजे मौज, मजा, पार्टी करण्याचं वय म्हणून आपणाकडे पाहिलं जातं. पण हेच वय काहीतरी वेगळं करून दाखविण्याचं असतं, हे रोहन किर्दत यांनी हेरलं. अन् नोकरी करण्याचा निर्णय घेतला.कोणतेही तंत्रज्ञानाचे शिक्षण नसल्याने त्यांना नोकरीत अडचणी होत्या. त्यातून त्यांनी सौरदिवे उत्पादन करण्याच्या कंपनीत नोकरी स्वीकारली. २००८-२००९ दरम्यान, सौरदिव्यांचा वापर वाढविण्यावर, या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात होते. अनुदान दिले जात होते. अनेक ग्रामपंचायतींशी करार करून गावात पथदिव्यांच्या ठिकाणी सौरदिवे बसविले जात होते. सर्व व्यवस्थित सुरू असताना ग्रामपंचायतींना पथदिवे पुरविण्याच्या कंपनीच्या यादीतून ते काम करत असलेल्या कंपनीला वगळण्यात आले. त्यामुळे तेथे काम करत असलेल्या सर्वच कामगारांबरोबरच रोहन किर्दत यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यानंतर एलईडी ब्लब, ट्यूब, वीज उपकरणे बनविणाऱ्या कंपनीत ते सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीला लागले. मात्र कंपनी व्यवस्थापनातील अंतर्गत वादावादीमुळे कंपनी बंद पडली. दोन-दोन नोकरी गेल्यानंतर कोणीही मनाने खचला असता. पण सातारा शहरातील या जिद्दी तरुणानं हीच संधी साधून स्वत:ची कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने माहिती घेण्यास सुरुवात केली. मोना स्कूलजवळ स्वत:चं युनिट तयार केलं. सातारा जिल्ह्यात एलईडी बल्ब बनविणारी पहिली कंपनी काढण्याचा मान त्यांना मिळाला. कंपनीत सध्या सुमारे बारा कर्मचारी कार्यरत आहेत.याठिकाणी सध्या एलईडीवर चालणारे ३ व्हॅटपासून १२ व्हॅटचे बल्ब, दहा व्हॅटपासून ते वीसचे अनुक्रमे दोन व चार फूट लांबीचे ट्यूब लाईट तयार केले जात आहेत. २०२१ हे वर्षे एलईडीचे असणारविजेचे दर वाढत चालल्याने कमी विजेवर चालणारे उपकरणे वापरणे क्रमप्राप्त ठरणार आहेत. त्यामुळे एलईडी दिवे, पथदिवे, ट्यूब आदी उपकरणे बनविण्याचा रोहन किर्दत यांनी निर्णय घेतला आहे. २०२१ पर्यंत बहुतांश शहरे एलईडी उपकरणे वापरणारी असणार आहेत. त्यामुळेच भविष्यात अठरा व्हॅट पासून एकशे वीस व्हॅट क्षमतेचे एलईडीवर चालणारे पथदिवेही बनविण्याचा मनोदय आहे.’ अशीही माहिती रोहनने ‘लोकमत’शी बोलताना दिली.