शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीत डिझेलवाहिनीला गळती

By admin | Updated: July 18, 2014 02:53 IST

पनवेल-सायन महामार्गालगत कळंबोली मार्बल मार्केट परिसरात गुरुवारी अचानक डिझेलच्या पाईपलाईनला गळती लागली.

पनवेल : पनवेल-सायन महामार्गालगत कळंबोली मार्बल मार्केट परिसरात गुरुवारी अचानक डिझेलच्या पाईपलाईनला गळती लागली. त्यामध्ये लाखो लीटर डिझेल पाण्यात गेले. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची माहिती मिळताच पेट्रोलियम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन इंधन वाहिनी दुरुस्त केली. पनवेल-सायन महामार्गाला समांतर एचपी कंपनीची इंधन वाहिनी आहे. आज दुपारी कळंबोली मार्बल मार्केटजवळ या डिझेल वाहिनीला गळती लागली. त्यातून डिझेलची गळती होऊन ते बाजूच्या नाल्यात वाहू लागले. आजूबाजूला वास येऊ लागल्याने या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले. त्याचबरोबर मुंबई आणि खोपोली येथील एचपी कंपनीच्या केंद्रालाही माहिती देण्यात आली. त्यानंतर या कंपनीचे अधिकारी तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले. त्याचबरोबर कळंबोली, कामोठे आणि वाहतूक विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी मार्बल मार्केटमध्ये आले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने सर्व वाहने महामार्गावर उभी राहिल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. मात्र या डिझेलच्या वाहिनीला गळती लागण्याचे कारण समजू शकले नाही. अंबरनाथमध्ये अ‍ॅसिड गळतीकाटई-कर्जत मार्गावर अंबरनाथ नजिकच्या रंगोली हॉटेलजवळ गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका टँकरमधून अ‍ॅसिड गळती सुरू झाली. गळतीनंतर चालक पळून गेला असून अग्निशमन दलाकडून गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ खबरदारीचा उपाय म्हूणन पोलिसांनी वाहतूक थांबवली आहे़ (वार्ताहर)