शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निराधार रुग्णाला सोडले रस्त्यावर

By admin | Updated: November 5, 2016 00:41 IST

एका वयोवृद्ध रुग्णाला रुबी हॉल क्लिनिक या नामांकित खासगी रुग्णालयाने भर रात्री रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला

पुणे : उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याचे कारण देत एका वयोवृद्ध रुग्णाला रुबी हॉल क्लिनिक या नामांकित खासगी रुग्णालयाने भर रात्री रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या रुग्णाला अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. नाना भिवा पांढरे असे या रुग्णाचे नाव आहे. पांढरे सोलापूर येथील असून त्यांच्या रक्तवाहिन्या गोठल्या आहेत. त्यांना ससून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथून उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे न्यावे असे सांगितले. रुग्ण दारिद्र्य रेषेखाली असून, उपचारांसाठी पैसे भरण्याची रुग्णाची परिस्थिती नव्हती. मात्र खासगी रुग्णालयात धर्मादायअंतर्गत येणाऱ्या मोफत उपचारांसाठी रुग्ण पात्र असल्याचे दिसत होते. कागदपत्रेही रुग्णाकडे उपलब्ध असूनही रुग्णालयाने रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. पैसे देण्याची त्याची ऐपत नसल्याने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने रात्रीच्या वेळी त्यांना रुग्णालयासमोरच्या रस्त्यावर सोडून देण्यात आले. ऐन थंडीत या रुग्णाला संपूर्ण रात्र रुग्णालयाच्या बाहेर कुडकुडत काढावी लागली. ससून रुग्णालयात पांढरे यांच्या आजारासंबंधी विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे पत्र त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिले होते. धमार्दाय आयुक्तालयाच्या अंतर्गत रुबी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात यावे, अशी विनंती ससून रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) विभागातर्फे पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र सायंकाळी पाचनंतर मोफत रुग्णांना दाखल केले जात नाही असे सांगत रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. पोलीस कारवाईची धमकी देत सुरक्षा रक्षकांच्या मदतीने रात्री साडेअकराच्या सुमारास रुग्णालयाच्या गेट क्रमांक दोन बाहेर रुग्णाला सोडून देण्यात आले. पायाच्या नसा गोठल्याने त्यांना व्यवस्थित चालता येत नसल्याने ते एकाच ठिकाणी रात्रभर बसून होते. पायाला जखमेमुळे वेदना होत असल्याने ते विव्हळत होते.अशी परिस्थिती इतर रुग्णावर पुन्हा येऊ नये, यासाठी रुग्णालयावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पांढरे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)>अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळया प्रकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणतीही अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. रुग्णालयाचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. पी.के. ग्रांट यांना विचारले असता, आपण मागील ८ दिवसांपासून शहरात नसून आपल्याला या प्रकरणाबाबत माहिती नाही असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर बोमी भोट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही वेळी रुग्णाला दाखल करून घेण्यात यावे, असा नियम असतानाही केवळ उपचाराचे पैसे देण्यासाठी असमर्थ असल्याचे कारण पुढे करीत पांढरे यांच्यावर उपचार करण्यास रुबी रुग्णालयाने असमर्थता दाखवली. या विरोधात डॅनीयल लांडगे, इरफान शेख व सुनील घाटे यांनी रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.संबंधित प्रकरणाची माहिती लांडगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ धमार्दाय आयुक्त नवनाथ जगताप यांच्याशी संपर्क साधून त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. आयुक्तांच्या आदेशानंतर पांढरे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.