शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आयफोन ७ घेण्यापूर्वी जाणून घ्या तोटे !

By admin | Updated: October 19, 2016 07:10 IST

अ‍ॅपलचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या ज्या आयफोन ७ व ७ प्लसचे गेल्या महिन्यात लाँचिग झाले त्याविषयी वापरकर्त्यांना अपेक्षा होत्या

मुंबई : अ‍ॅपलचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या ज्या आयफोन ७ व ७ प्लसचे गेल्या महिन्यात लाँचिग झाले त्याविषयी वापरकर्त्यांना अपेक्षा होत्या. पण आयफोन ७ आणि ७ प्लसकडून या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. अपेक्षित असे कोणतेही नावीन्यपूर्ण, क्रांतीकारी तंत्रज्ञान या दोन्ही फोनमध्ये नसल्याचे मोबाइलधारकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल कंपनी हे दोन्ही नवीन मोबाईल बाजारातून काढून घेण्याची वा त्यात अपडेट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापैकी कोणताही फोन घेण्याची घाई न करणे योग्य ठरेल. बहुतेक मोबाइल ड्युएल सीम आहेत. पण आयफोन सिंगल सीम आहे. त्यामुळे आयफोन युझर्सना दुसरा फोनही बाळगावा लागेल. संगणकावरुन गाणी, फिल्म, व्हिडीओ आयफोनमध्ये टाकता येत नाही. त्यासाठी आय ट्यून्स सॉफ्टवेअर संगणकावर आवश्यक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अँड्रॉइड फोनशी आयफोनची तुलना करता, अँड्रॉइड वापरकर्त्यांना जास्त फायदे मिळतात. आधीच्या आयफोनशी तुलना करता ७ मध्ये फारसे काही नवीन नाही. आयफोन ७ मध्ये आयओएस १0 ही सिस्टीम आहे. ती आयओएस ९ ची अपडेटेड व्हर्जन आहे. त्यामुळे मोबाइलला फारसा फायदा होत नाही. आयफोन ७ विकत घेणाऱ्या अनेकांनी सिग्नल ड्रॉप व जीपीएस व्यवस्थित चालत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. गुगल मॅप वापरताना नो सिग्नल आयकॉन दिसत असल्याचीही तक्रार आहे. >एवढा महागडा फोन घेऊनही आपल्याला हवे तसे हेडफोन कनेक्ट करता येणार नाहीत. कारण या फोनमध्ये हेडफोन जॅक काढून टाकलेले आहे. नवा हेडफोन हरवल्यास दुसरा खरेदी करताना भरमसाठ पैसाही खर्च होईल.>आयफोन ७ मध्ये जी नवे फिचर्स आहेत, त्याला अधिक बॅटरी लागते. त्यामुळे भविष्यात बॅटरीची समस्या उद्भवू शकते. आयफोन ७ ची बॅटरी आयफोन ६ च्या तुलनेत एक ते दोन तासच जास्त चालू शकते. आयफोन ७ च्या रॅममध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही, आयफोन ६ एस प्रमाणेच २ जीबी रॅम देण्यात आला आहे.अ‍ॅपलने नव्या आयफोन ७ मध्ये वायरलेस इअरपॅडसचा वापर केला आहे. या इअरपॅडसच्या चोरी होण्याची शक्यता अधिक आहे.