शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कष्ट कमी केल्यास शेतीकडे ओढा : मानकर

By admin | Updated: October 13, 2014 23:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर

दापोली : सद्यस्थितीत कोकणात शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब खूपच कमी होत आहे. काही प्रमाणात येथील हवामान व भौगोलिक परिस्थिती याला कारणीभूत आहे. तथापी शक्य तेथे यांत्रिक पद्धतीचा अवलंब करुन शेतीमधील कष्ट कमी केल्यास, सुरक्षित अशा यंत्राचा अथवा अवजारांचा वापर केल्यास शेती करण्यामागे कोकणवासीयांचा ओढा वाढेल आणि पर्यायाने आज ओस पडत चाललेल्या शेतीला उर्जितावस्था येईल. त्यामुळे कोकणातून होणारे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल, असा ठाम विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव मानकर यांनी व्यक्त केला.दापोली येथे आयोजित केलेल्या सातव्या अखिल भारतीय स्तरावरील कार्यशाळेमध्ये ते मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले की, आज शेती, अवजारे, साधने निर्माण करताना श्रमविज्ञान शास्त्र आणि सुरक्षिततेचा विचार केला जातो, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. तरीसुद्धा याच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचाही विचार केला गेल्यास अधिक प्रमाणात श्रम कमी करणे शक्य होईल. यासाठी लोणेरे येथील तंत्रज्ञान विद्यापीठाचे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासनही डॉ. मानकर यांनी दिले. यावेळी अखिल भारतीय श्रमविज्ञान समितीचे अध्यक्ष आणि आय. आय. टी., मुंबईचे प्राध्यापक म्हणाले की, शेतीसाठी अत्याधुनिक अवजारे, साधने वापरल्यास श्रम कमी होतील. त्यासाठी आपण जास्तीत जास्त कार्यक्षम असण्यावर भर दिला पाहिजे. आय. आय. टी., मुंबई आणि दापोली कृ षी विद्यापीठाने एकत्रितपणे काम केल्यास निर्माण होणारी अवजारे, साधने अधिक सुकर होतील आणि त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होईल. मानकर यांनी शेतीसाठी वापरावयाची साधने व याबाबतचे नवीन, प्रगत तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी कोकण कृ षी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेचे प्रकल्प समन्वयक डॉ. लक्ष्मण गीते, कृषियंत्र व अवजारे विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत शहारे उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकिता पाटील हिने केले. डॉ. प्रशांत शहारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे कुलगुरूंचे आवाहन यांत्रिकीपध्दतीचा अधिक वापर झाल्यास फायदाकष्ट कमी केल्यास अधिक उत्पादन कार्यक्षमता वाढविण्याचा दिला मानकर यांनी सल्ला कृषी विकासासाटी एकत्रित काम करण्याचे सूतोवाचनव्या अवजारांचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास फायदा