शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पर्यटकांचा विदर्भाकडे ओढा

By admin | Updated: September 15, 2014 01:02 IST

विदर्भातील घनदाट जंगल व त्यामधील वन्यप्राणी आता विदेशी पर्यटकांना चांगलेच खुणावू लागले आहे. याचाच एक भाग म्हणून नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ५ देशातील २१ विदेशी पर्यटकांनी ताडोबा येथे भेट देऊन,

२१ विदेशी पाहुण्यांची ताडोबात जंगल सफारी : एमटीडीसीतर्फे आयोजन नागपूर : विदर्भातील घनदाट जंगल व त्यामधील वन्यप्राणी आता विदेशी पर्यटकांना चांगलेच खुणावू लागले आहे. याचाच एक भाग म्हणून नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ५ देशातील २१ विदेशी पर्यटकांनी ताडोबा येथे भेट देऊन, येथील जंगल सफारीचा मनसोक्त आनंद लुटला. यात अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इटली व स्लोवकिया येथील पर्यटकांचा समावेश होता. विशेष म्हणजे, अलीकडे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) विदेशी पर्यटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात एमटीडीसीचे नागपुरातील वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे फार मोलाची भूमिका बजावित आहे. हेडे यांनी विदेशी पर्यटकांसाठी गत १२ व १३ सप्टेंबर अशा दोन दिवसांचा कार्यक्रम आखला होता. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी या पर्यटकांचा नागपुरातून प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यानंतर ते दुपारी ताडोबा येथे पोहोचले. तेथे एमटीडीसीच्या पर्यटन निवासात त्यांचे पारंपरिक पद्घतीने स्वागत करण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमानंतर ताडोबा येथे एमटीडीसीने तयार केलेले इको फ्रेडली कॉटेजेस्, योगा हट व व्हीआयपी सूट दाखविण्यात आले. यानंतर लगेच मोहर्ली गेटवरून जंगलात प्रवेश करून, जंगल सफारी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी (१३ सप्टेंबर) सकाळी ६ वाजता वॉकिंग सफारी करण्यात आली. यात विदेशी पर्यटकांनी पक्षी निरीक्षण व जंगल भ्रमंतीचा आनंद घेतल्याची माहिती हेडे यांनी दिली. यावेळी विदेशी पर्यटकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, विदर्भातील पर्यटनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अमेरिकेतील हॅरी डग्गुबॅटी यांनी ताडोबा येथे क्रीडा सफारीसाठी फार मोठा वाव असल्याचे सांगितले. तसेच इटली येथील ल्युडिया चॅपुटो यांनी ताडोबा जंगलात विविध दुर्मिळ प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. (प्रतिनिधी)