शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या पाणी पुरवठ्याला गळती

By admin | Updated: January 7, 2017 03:24 IST

पालघर व २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी मासवण येथून शेलवली जलशुद्धीकरण केंद्र व पुढे हे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी टाकलेली जलवाहिनी जीर्ण

निखिल मेस्त्री,नंडोरे (ता. पालघर)- पालघर व २६ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी मासवण येथून शेलवली जलशुद्धीकरण केंद्र व पुढे हे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी टाकलेली जलवाहिनी जीर्ण होत चालली असून काही ठिकाणी या वाहिनीला छिद्रे पडून व एअर व्हॉल्व्हच्या जोडणीच्या ठिकाणी भेगा पडून त्यातून गळती होऊन रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेचा सांभाळ करणारी नगरपरिषद प्रशासन मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या गळतीवरून स्पष्ट होत आहे.वाघोबा खिंडीच्या वाघोबा मंदिरापासून समांतर मनोरकडे जाताना उजव्या बाजूस या जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह जोडणीचा पाईप जोडलेल्या ठिकाणी जीर्ण होऊन त्याला भेगा पडून, जलवाहिनीच्या उच्च दाबामुळे यातून पाणीगळती होऊन याठिकाणी पाण्याचे कारंजे बनल्याचे दिसते व रोज या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येथून ये जा करणारेही हे पाणी वाया जात असल्याची खंत व्यक्त करतात.मासवण येथून आणलेले अशुद्ध पाणी या घाट परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात आल्यानंतर शुद्ध पाणी पुरवणारी जलवाहिनी या केंद्राच्या थोड्या पुढे जाऊन तिथेही जलवाहिनीला छिद्रे पडली असून त्यातूनही पाणीगळती होऊन रोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसते.ही जलवाहिनी फुटेपर्यंत नगरपरिषद वाट पाहत आहे का? असा सवाल येथे उपस्थित होत आहे. >दुर्घटना घडण्याची शक्यता बळावलीपाणी आणणारीं व नेणारी ही जलवाहिनीची योग्य ती चाचणी करून तिची देखभाल व दुरूस्ती करणे अपेक्षित असताना या गंभीर बाबीकडे नगरपरिषद एवढ्या मिहन्यांपासून पार दुर्लक्ष करीत आहे. तसेच एवढ्या उच्च दाबाच्या या जलवाहिनीस अशा गळतीमुळे फुटण्यास वेळही लागणार नाही. या दुर्लक्षित कारभारामुळे त्यातून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही हे नगरपरिषदेने लक्षात घेतलेले बरे.हि होणारी पाणी गळती व त्यातून रोज वाया जाणारे हजारो लिटर पाणी याकडे नगरपरिषद यंत्रणेने गाम्भिर्याने लक्ष देऊन हि गळती थांबविण्यासाठी योग्य ती पावले उचलायला हवीत.जनतेला पाणी हेच जीवन व पाणी वाचवा असे पाणी बचतीचे धडे प्रशासनामार्फत देण्यात येतात,जनतेला धडे देणाऱ्या या यंत्रणेला पाणीबचतीचे महत्व कोणी शिकवावे हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.