कर्जत : रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वरील पत्र्याच्या शेडला गळती लागली होती. सुमारे दोन वर्षे या फलाटावर अक्षरश: धबधबा पडत असल्यासारखे वाटत होते. ही गळती काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने फुटलेले पत्रे तीन-चार महिन्यांपूर्वी काढले. त्यातील काही बदलण्यात आले. परंतु अद्यापही काढलेल्या पत्र्यांपैकी ऐंशी टक्के पत्रे बसविणे बाकी असल्याने या फलाटावरून जाताना रेल्वे प्रवाशांना छत्रीचा आधार घ्यावा लागतो. यामुळे हे काम लवकरात लवकर करण्याची मागणी प्रवाशांकडून के ली जात आहे.कर्जत रेल्वे स्थानकातील मुंबई बाजूकडील पादचारीपूल बांधण्याच्या वेळी फलाट क्रमांक १ वरील त्या भागातील पत्रे काढले. त्याचबरोबर ज्या ठिकाणी गळती होती त्या भागातील पत्रेसुद्धा काढण्यात आले होते. पत्रे काढून झाल्यावर अनेक महिने हे छप्पर तसेच उघडे होते. त्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर त्या भागातील केवळ वीस टक्के पत्र्याचे तुकडे बसविले. मात्र आता पावसाळा मध्यावर आला तरी पत्रे बसविण्याचे काम सुरू केले नाही. त्यामुळे फलाटावर मोठ्या प्रमाणात गळती होत असून, रेल्वे प्रवाशांना फलाटावर छत्री घेऊन थांबावे लागते. या फलाटावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात त्यासाठी आरक्षण असते. जर आरक्षण असलेले डबे ज्या भागावर पत्रे नाहीत त्या जागेवर आले तर प्रवाशांचे किमती सामान भिजते. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. शेडचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे.>पत्र्याच्या शेडचे काम करण्याची मागणीसध्या जोरदार पाऊस सुरू असून कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर पत्र्याचे शेड नसल्याने गळतीमुळे प्रवाशांना बसणे गैरसोयीचे होत आहे. याच फलाटावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. त्यासाठी आरक्षण असते. जर आरक्षण असलेले डबे ज्या भागावर पत्रे नाहीत त्या जागेवर आले आणि त्याच वेळी पाऊस सुरू असेल तर प्रवाशांचे किमती सामान भिजते. त्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. या शेडचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
कर्जत रेल्वे स्थानकात गळती
By admin | Updated: August 1, 2016 02:51 IST