शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

पनवेलमधील एलिव्हेटेड ब्रीजला लागली गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 01:40 IST

शंभर कोटींपेक्षा जास्त खर्च करून रस्ते विकास महामंडळाकडून बांधलेल्या पनवेल शहरातील एलिव्हेटेड ब्रीजला (उन्नत मार्गाला) गळती लागली

कळंबोली : शंभर कोटींपेक्षा जास्त खर्च करून रस्ते विकास महामंडळाकडून बांधलेल्या पनवेल शहरातील एलिव्हेटेड ब्रीजला (उन्नत मार्गाला) गळती लागली आहे. काही ठिकाणी धबधब्यासारखे पाणी खाली पडत असल्याने या ठिकाणाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक आनंद भंडारी यांनी केली आहे. याबाबत रस्ते विकास महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पुलाला धोका निर्माण झाला असून अपघातालाही निमंत्रण मिळत आहे.शहरातून एनएच-४ जात असून त्यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी व्हायची. ही कोंडी फोडण्यासाठी या ठिकाणी एलिव्हेटेड ब्रीज बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला. २०१३ मध्ये हा मार्ग वाहतुकीकरिता खुला करण्यात आला. जवळपास पावणे दोन कि.मी. अंतर असलेल्या या उन्नत मार्गाचे काम जेएमसी या कंपनीला देण्यात आले होते. मात्र सध्या पुलाला मोठी गळती लागली आहे. पुलाच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केल्याने अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता कडेला पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. परंतु बहुतांशी ठिकाणी ही पाइपलाइन फुटल्याने खाली रस्त्यावर वेगाने पाणी कोसळते. पुलाच्या समांतर असलेल्या रस्त्यावर पाणी साचत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.पुलावरून जोरात धबधब्यासारखे पाणी पडत असल्याने खालून जाणाऱ्या वाहनांचे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. कित्येकदा दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्ते विकास महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याठिकाणचे पथदिवेही बंद आहेत. महामार्गावर दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आनंद भंडारी यांनी केला आहे.