शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पुढाऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात

By admin | Updated: November 17, 2016 03:34 IST

जिल्हा सहकारी बँकांना हजार-पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सुरुवातीला दिली होती

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकांना हजार-पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सुरुवातीला दिली होती, पण चार दिवसांत काहीतरी गडबड दिसली. शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज खात्यात अचानक पैसे जमा होऊ लागले. हे पैसे कोण भरतेय? काळ्या पैशांवाले तर शेतकऱ्यांच्या नावे पैसे खपवत नाहीत ना? असा संशय कदाचित ‘आरबीआय’ला आलेला असावा. त्यामुळेच जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी करण्यात आली, असा तर्क सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे ‘लोकमत’शी बोलताना मांडला. जिल्ह्यातील सहकारी बँका व साखर कारखान्यांचा आढावा घेण्यासाठी देशमुख बुधवारी नगरला आले होते. या वेळी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. जिल्हा बँकांच्या नोटबंदीकडे लक्ष वेधले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले. वर्षानुवर्षे शेतकऱ्यांची जी कर्जे थकीत आहेत, ती भरली गेल्याने संशय निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जिरवून, नंतर पुन्हा जमेल तेव्हा ते वसूल करायचे, असा काही लोकांचा प्रयत्न दिसतो. सहकाराच्या शुद्धिकरणासाठी सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. सहकारात माहिती अधिकारासह अन्य काही कायदे आणणे आवश्यक आहे का? याचीही चाचपणी केली जात आहे. सभासदांच्या सर्व शंकांचे निरसन संस्थांनी केले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. पिशवीतल्या संस्था खोलीत यायला हव्यात. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेवा सोसायटीचे सभासद करून घेण्याचे सरकारचे धोरण आहे. नगर जिल्ह्यात एक लाख सभासद झाले आहेत. बाजार समित्यांचा मतदार हा थेट शेतकरी असावा, असेही आपले धोरण आहे. मात्र, यासाठी विधेयक आणावे लागेल, असे ते म्हणाले. कोणतेही सहकारी साखर कारखाने बंद पडू नयेत असे सरकारचे धोरण आहे. कारखान्यांना कर्ज हवे असेल तर संचालकांनी यापुढे आपली मालमत्ता तारण द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी ऊस कमी आहे. त्यामुळे कारखान्यांनी एकमेकांचा ऊस पळवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. (प्रतिनिधी)