शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांना सहकारी बँकांचे ‘कुरण’ बंद

By admin | Updated: January 23, 2016 04:04 IST

गेल्या १० वर्षांत गैरकारभारामुळे बरखास्तीची कारवाई झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँका व नागरी सहकारी बँकांवरील तत्कालीन संचालकांना यापुढे १० वर्षांसाठी बँकेची निवडणूक

विश्वास पाटील,  कोल्हापूरगेल्या १० वर्षांत गैरकारभारामुळे बरखास्तीची कारवाई झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँका व नागरी सहकारी बँकांवरील तत्कालीन संचालकांना यापुढे १० वर्षांसाठी बँकेची निवडणूक लढविण्यास मनाई करणाऱ्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी सही केली. यामुळे जिल्हा व नागरी सहकारी बँकांवर हुकूमत गाजविलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसणार आहे.नव्या अध्यादेशामुळे २१ जानेवारी २००६नंतर अशी कारवाई झालेल्या बँकांचे सर्व संचालक आता अपात्र ठरले आहेत. राज्य बँकेसह ५ जिल्हा मध्यवर्ती बँका आणि ६० नागरी सहकारी बँकांच्या संचालकांवर या अध्यादेशान्वये कारवाई होणार आहे. या बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने संबंधित बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय मंडळ नियुक्त केले. त्यानंतर या बँकांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये या बँका ज्यांनी खड्ड्यात घातल्या तेच लोक पुन्हा राजकीय व आर्थिक ताकदीचा वापर करून निवडून आले. त्यामुळे अशा संचालकांच्या हातात बँक कशी सुरक्षित राहणार असा विचार करून अशा संचालकांना सहकारी बँकांना निवडणुका लढविण्यास बंदी घालण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने वर्षभरापूर्वीच दिले होते.ही कारवाई कोणत्याही राजकीय आकसाने केलेली नाही. जिल्हा बँका व नागरी सहकारी बँकांमध्येही सर्वसामान्य ठेवीदार व शेतकऱ्यांची पुंजी जमा असते. ती सुरक्षित राहावी असाच रिझर्व्ह बँकेचा आग्रह होता. नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा बँकेचा भ्रष्टाचाराच्या कारणांवरून रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवानाच रद्द केला. त्यांना जेव्हा नव्याने परवाना द्यावा असा आग्रह राज्य शासनाने धरला, तेव्हा तुम्ही भ्रष्ट संचालकांवर कारवाई करणार असे लेखी द्यावे अशी अट रिझर्व्ह बँकेने घातली होती. त्या करारानुसारच मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, हसन मुश्रीफ, दिलीप सोपल, आमदार जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, आमदार अमरसिंह पंडित, यशवंत गडाख, दिलीप देशमुख, विजय वड्डेटीवार, मधुकरराव चव्हाण, माणिकराव कोकाटे, पांडुरंग फुंडकर, जगन्नाथ पाटील आदी.