शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मुलींचा एनसीसीकडे ओढा

By admin | Updated: September 22, 2014 02:12 IST

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) देशात वेगाने वाढत असून,अलीकडे एनसीसीचे प्रशिक्षण घेण्याकडे मुलींचाही ओढा वाढला आहे.

अकोला : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) देशात वेगाने वाढत असून, अलीकडे एनसीसीचे प्रशिक्षण घेण्याकडे मुलींचाही ओढा वाढला आहे. हे चांगले संकेत असून, भविष्यात हे प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल सुबोध कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.सुबोध कुमार यांच्या उपस्थितीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना मानद कर्नल पदवी देण्यात आली. राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्र निर्मितीसाठी बांधील आहे. राष्ट्रप्रेम तसेच देशसेवेची जबाबदारी विद्यार्थीदशेपासूनच आपल्यावर असते, याची जाणीव कॅडेटस्मध्ये निर्माण केली जाते. या माध्यमातून अनेक कॅडेटस् या तिन्ही दलांमध्ये सेवा देत आहेत. महाराष्ट्रात एनसीसीला चांगला प्रतिसाद आहे. मुलांसोबतच मुलींचेसुद्धा एनसीसीमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे; परंतु या तिन्ही दलांमध्ये भरती होण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे, असे त्यांनी सांगितले. कॅडेटला सैन्यदलाच्या लेखी परीक्षेमध्ये काही अंशी सूट दिली जाते. एनसीसीचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावरही भर दिला जात आहे. राज्यात एनसीसीचा विस्तार जलद गतीने होत असून, वाशिम जिल्हा झाल्यापासून येथे स्वतंत्र एनसीसी बटालियन नसल्याने, या जिल्ह्याला एक नवी बटालियन उभारण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.एनसीसीचे कॅडेट असलेले व देशसेवेची प्रेरणा निर्माण करणाऱ्या अनेकांना मानद कर्नल पदवी देण्यात आली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, जया बच्चन, उद्योगपती आदी गोदरेज इत्यादी मान्यवर एनसीसीचे कॅडेटस् राहिलेले आहेत. त्यांनाही मानद कर्नल पदवी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)