शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

एलसीएफ क्वॉइन क्लबचे हजारोंचे नेटवर्क अकोल्यात

By admin | Updated: May 20, 2017 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बीट क्वॉइनच्या तुलनेत आता चीनने एलसीएफ नावाचे व्हेब चलनी क्वॉइन बाजारपेठेत आणले असून, त्याचे नेटवर्क जगभरात पसरले आहे. त्यात अकोला मागे नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बीट क्वॉइनच्या तुलनेत आता चीनने एलसीएफ नावाचे व्हेब चलनी क्वॉइन बाजारपेठेत आणले असून, त्याचे नेटवर्क जगभरात पसरले आहे. त्यात अकोला मागे नाही. दिल्लीच्या एका नेटवर्कमध्ये अकोल्यातही एलसीएफ क्वॉइन क्लबचे जाळे विस्तारले असून, तब्बल एक हजार सदस्य यामध्ये जोडल्या गेले आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी आता व्हेब क्वॉइनचा व्यवहार वाढतो आहे. विशेष करून हा व्यवहार संगणक साक्षर असलेल्या सुशिक्षित वर्गात जास्त असून, त्याचा वापर भारतातही होत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बीट क्वॉईन खरेदी करणाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस भारतीयांची संख्या वाढत आहे. कमी रुपयांमध्ये खरेदी केलेल्या बीट क्वॉईनचे खरेदीदार आता श्रीमंत झाले आहे. बीट क्वॉईनला मात्र अजून राजाश्रय मिळालेला नाही. या तुलनेत चीनच्या एलसीएफ क्वाईन क्लबचे गत काही महिन्यांत केवळ चीनमध्येच नव्हे, तर जगभरात मोठे जाळे विस्तारले आहे. चीनच्या सरकारने त्यास अधिकृत मान्यता दिल्याने जगभरात आता एलसीएफ क्वॉईन क्लब वाढत आहे. दिल्लीच्या नेटवर्कमध्ये अकोला आणि महाराष्ट्रातील मोठा वर्ग जुळला आहे. या क्लबच्या माध्यमातून लोकांना तीन हजार व्हेब क्वॉइन दिले गेले असले, तरी अजूनही अनेकांचा या प्रणालीवर विश्वास नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपवरून मोठे नेटवर्क सक्रिय झाले असून, त्यात अकोल्यातील हजारो युवकांना सहभागी करण्यात आले आहे.