शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी टोलवला!

By admin | Updated: June 11, 2014 03:03 IST

एलबीटी वसूल करण्याच्या पद्धतीत बदल करून ही वसुली विक्रीकर विभागाकडे सोपविण्याचा पर्याय सरकारपुढे खुला आहे

एलबीटी की जकात ? : सरकारने महापालिकांवर सोडला पर्यायाचा निर्णय
मुंबई : एलबीटी वसूल करण्याच्या पद्धतीत बदल करून ही वसुली विक्रीकर विभागाकडे सोपविण्याचा पर्याय सरकारपुढे खुला आहे. एलबीटी वसुलीसाठी विक्रीकर विभागाचा पर्याय स्वीकारायचा की जकातीसारखी कालबाह्य पद्धत स्वीकारायची, याबाबत व्यापा:यांची मते घेऊन सरकारला कळवावी, म्हणजे अधिवेशनापूर्वी निर्णय घेणो शक्य होईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केले.
एलबीटी रद्द करून महापालिकांच्या पर्यायी उत्पन्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्नी पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यापारी प्रतिनिधी आणि महापौर व आयुक्तांसोबत घेतलेल्या बैठकांमध्ये अंतिम निर्णय होऊ शकला नाही. एलबीटीला पर्याय देताना महापालिकांची स्वायत्तता कायम ठेवली जाईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केल्याने एलबीटीऐवजी व्हॅटवर सरचार्ज हा पर्याय आता खारिज झाल्याने आणि आता एलबीटी की जकात, असे दोनच पर्याय समोर असल्याचेही स्पष्ट झाले. 
एलबीटीला शासन लवकरच पर्याय देईल, असे मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. मात्र मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज घेतलेल्या महापौर, महापालिका आयुक्तांच्या बैठकीत कुठलाही अंतिम निर्णय झाला नाही. उलट निर्णय महापालिकांवर सोडण्यात आला. आता त्यांनीच व्यापा:यांशी चर्चा करून दोन दिवसांत सरकारला पर्याय सांगावा, असे निर्देश देण्यात आले. दरम्यान, या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी दुपारी व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा केली. या बैठकीला फामचे अध्यक्ष मोहन गुरनानी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईसह राज्यातील महापालिकांचे जकात उत्पन्न 16 हजार कोटींचे आहे. व्हॅटवर 1 टक्का सरचार्ज लावला तर 65क् कोटी रुपये जमा होतील. तसेच आधीच व्हॅट जास्त असताना सरचार्ज लावण्यास विधी व न्याय खाते अनुकूल नसल्याचेही सांगण्यात आले. व्यापा:यांनी एलबीटीही नको व जकातही नको, व्हॅटवर 1 टक्का सरचार्ज लागू करा. अन्य उत्पन्नाचे स्त्नोत तपासा, अशी भूमिका घेतली. मात्न व्हॅटवर सरचार्ज लावण्याचा पर्याय स्वीकारता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
 
वसुली विक्रीकर विभागाकडे?
एलबीटी ही सुटसुटीत पद्धत आहे. ब:याच महापालिकांचे एलबीटीमुळे उत्पन्न वाढले आहे. तथापि, एलबीटीच्या वसुलीत महापालिका अधिका:यांकडून आणि कर्मचा:यांकडून त्रस दिला जातो, अशा व्यापा:यांच्या तक्रारी आहेत. यावर उपाय म्हणून एलबीटीची वसुली विक्रीकर विभागाकडे देण्याचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री आजच्या बैठकीत म्हणाले.  
 
मनपांची मागणी फेटाळली
च्एलबीटीही नको आणि जकातही नको, आम्हाला सरकारनेच पैसा द्यावा, ही काही महापालिकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली. नागपूर, सांगली-मीरज-कुपवाड, मालेगाव, उल्हासनगरच्या महापौरांनी अशी मागणी केली होती. 
च्एलबीटी की जकात यापैकी एक पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य महापालिकांना राहील, असे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भूमिकेमुळे स्पष्ट झाले. त्यामुळे एलबीटी सरसकट रद्द केली जाणार नाही, हेही स्पष्ट झाले. महापालिकांकडून प्रस्ताव आल्यास जकात की एलबीटी, हा पर्याय निवडण्याची मुभा महापालिकांनाच देण्यात येणार आहे.