शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीचा चेंडू महापालिकांच्या कोर्टात

By admin | Updated: June 10, 2014 23:20 IST

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर व्यापारी वर्गास खूष करण्यासाठी राज्यशासनाकडून स्थानिक संस्था कर ( एलबीटी) रद्द करण्याचा तिढा आणखीनच वाढला आहे.

पुणे : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर व्यापारी वर्गास खूष करण्यासाठी राज्यशासनाकडून स्थानिक संस्था कर ( एलबीटी) रद्द करण्याचा तिढा आणखीनच वाढला आहे. या निर्णया विरोधात महापालिकाही आक्रमक झाल्याने राज्यशासनाची कोंडी झाली असून आता या बाबतचा निर्णय महापालिकांनीच आपल्या स्तरावर व्यापा-यांशी चर्चा करून दोन दिवसांच्या आत राज्यशासनास कळावावा असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापौरांना दिला आहे. त्यामुळे एलबीटीचा निर्णय आता महापालिकांनाच घ्यावा लागणार असून त्यामुळे व्यापारी आणि महापालिकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एलबीटी रद्द करण्यासाठी राज्यशासनाच्या गेल्या काही दिवसांपासून मँराथॉन बैठका सुरू आहेत. एलबीटीला पर्याय म्हणून पुन्हा जकात लागू करणे, व्हँट अथवा सेल टँक्सवर सर चार्च लावून महापालिकांना अनुदान देणे हे पर्याय राज्यशासनाने पुढे केले आहेत. मात्र, राज्यशासनाच्या या निर्णया विरोधात राज्यातील प्रमुख महापालिकांच्या पदाधिका-यांनी तसेच कर्मचा-यांनी आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे महापालिकांचे महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीचे आयोजन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई येथे बोलविली होती. या बैठकीस राज्यातील 25 महापालिकांचे महापौर आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते. यावेळी जवळपास सर्वच महापालिकांनी पालिकांचे असतित्व राज्यशासनाने धोक्यात आणू नये तसेच प्रत्येक महापालिकेस आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी केली. तर काही महापालिकांनी एलबीटी रद्द करून पुन्हा जकात सुरू करण्याची मागणी केली असल्याचे पुण्याच्या महापौर चंचला कोद्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच पुढील दोन दिवसात बैठकीस उपस्थित असलेल्या महापौरांनी, महापालिका आयुक्तांसह शहरातील व्यापा-यांची बैठक घेऊन आपला निर्णय राज्यशासनास कळवावा अशा सूचना मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिल्या असल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, येत्या दोन दिवसात ही बैठक घेऊन राज्यशासनास निर्णय कळविण्यात येणार असल्याचे कोद्रे यांनी स्पष्ट केले.मोठया महापालिकांना हवा एलबीटीच !जकातीच्या तुलनेत एलबीटीमुळे पालिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली असून तो रद्द करू नये अशी मागणी पुणे , ठाणे, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबई या मोठया महापालिकांच्या महापौरांनी या बैठकीत केली. तर इतर सर्व लहान महापालिकांनी शासनाने एलबीटी आणि जकात दोन्हीही रद्द करून शासनाने पालिकेस अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.