शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

एलबीटी घोटाळ्याच्या फायली नेताना पकडले

By admin | Updated: December 26, 2015 00:38 IST

महापालिका एलबीटी विभागातील घोटाळ्याचे प्रकरण गाजत असतानाच चौकशी अधिकारी दिलीप विसपुते घोटाळ्यासंबंधीची फाईल घरी नेताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना

- सदानंद नाईक, उल्हासनगरमहापालिका एलबीटी विभागातील घोटाळ्याचे प्रकरण गाजत असतानाच चौकशी अधिकारी दिलीप विसपुते घोटाळ्यासंबंधीची फाईल घरी नेताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले आणि उपायुक्त नितीन कापडणीस यांच्यासमोर हजर केले. कापडणीस यांनी विसपुते यांना तंबी दिली.सलग सुट्या असल्याने चौकशीच्या कामाकरिता एलबीटी घोटाळ्यासंबंधीच्या काही फायली आपण घरी नेत होतो, असा खुलासा विसपुते यांनी केला असला तरी चौकशी सुरू असलेल्या प्रकरणाच्या फाईल कार्यालयाबाहेर नेऊ नका, असे उपायुक्त कापडणीस यांनी त्यांना बजावले. विभागात २०० कोटींचा घोटाळा झाल्याचे बोलले जात असून आयुक्तांनी १६ जणांना निलंबित करून ५० जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.महापालिकेने शासननिर्णयानुसार जकातीऐवजी एलबीटी लागू केली. जकातीपासून दरमहा १६ कोटी तर एलबीटीपासून ८ कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळाले. एलबीटी लागू केल्याने महापालिकेचे २०० कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. कर्मचारी, व्यापारी व स्थानिक नेत्यांच्या संगनमताने एलबीटी घोटाळा घडून आल्याचा आरोप होत आहे. विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी आयुक्ताकडे लावून धरल्यावर चौकशी सुरू झाली. एलबीटीचे उत्पन्न कमी येत होते, त्या वेळी पालिकेने त्याची दखल का घेतली नाही, असा प्रश्न मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांनी केला आहे. पालिका महासभेत एलबीटी घोटाळ्याचा आरोप काही नगरसेवकांनी करून आयुक्तांना पुरावे दिले होते. वेळीच चौकशी झाली असती तर घोटाळेबहाद्दरांची नावे उघड झाली असती, अशी टीका नगरसेवकांनी केली.व्यापारी, अधिकारी, नगरसेवक वादात एलबीटी विभागातील घोटाळ्याप्रकरणी व्यापाऱ्यांसह अधिकारी, कर्मचारी व नगरसेवक वादात सापडले आहेत. ९० टक्के व्यापाऱ्यांनी वर्षानुवर्षांचे वार्षिक विवरणपत्र सादर केले नसल्याचे उघड झाले आहे. पालिकेने अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी १२ हजार व्यापाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार दंड ठोठावला आहे. विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी घोटाळा उघड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांनी ७०पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर वसुली कमी करणे, व्यवहारात अनियमितता, वारंवार तक्रारी असा ठपका ठेवला आहे. नगरविकास राज्यमंत्र्याचे चौकशी आदेश : नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. बुधवारी सायंकाळच्या वेळी चौकशी अधिकारी विसपुते शिपायामार्फत घोटाळ्यातील फाईल घरी नेत असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.