शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘लक्ष्मी’रूपी मुलीलाच ३० हजारांत विकले!

By admin | Updated: October 24, 2014 03:53 IST

मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांनी शशिकांत केंदाळे व त्याच्या प्रेयसीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भडगाव (जि. जळगाव) : दिवाळीच्या पर्वात लक्ष्मीपूजनाचे विशेष आहे. मात्र या प्रकाशपर्वातच एका नराधम बापाने साडेपाच वर्षीय लक्ष्मी नावाच्या मुलीला ३० हजार रुपयांत विकल्याची संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांनी शशिकांत केंदाळे व त्याच्या प्रेयसीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लक्ष्मीला जयपूर येथून भडगावला आणले आहे. आरोपींनाही ताब्यात घेतले आहे.१२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता लक्ष्मीला रेशन दुकानावर घेऊन जातो, असे सांगत पती शशिकांत वाल्मीक केंदाळे हा थेट मुंबईला घेऊन गेला. तो मोलमजुरी करतो. मुंबईला गेल्यावर विठ्ठलवाडीमधील (उल्हासनगर) त्याची प्रेयसी शीतल बागूल हिच्यासमवेत लताबाई हिच्याकडे मुक्काम केला. तेथून ते सिंधी कॅम्प चेंबूर येथील तायराबाई हिच्या घरी गेले. तेथे तायराबाईच्या मध्यस्थीने सनी नावाच्या इसमास बोलावून त्याचेसोबत लक्ष्मीचा सौदा ठरवला. १५ हजार रुपये आगाऊ रक्कम घेतल्यावर शशिकांत केंदाळे, शीतल बागूल हे मुलीसमवेत वांद्रे रेल्वे स्टेशनवरून गाडीने जयपूर येथे गेले. तेथे सनीने मुलीचा ताबा घेतला व उर्वरित १५ हजार रुपये शशिकांतला दिले. नंतर शशिकांत हा शीतल बागूलला घेऊन नंदुरबारला आला. यानंतर तेथून तो एकटा भडगावला परतला. मुलीबाबत पतीला विचारले असता त्याने सांगण्यास टाळाटाळ केली, असे सुरेखा केंदाळे (रा. यशवंत नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.पतीने माहिती न दिल्याने सुरेखा यांनी पोलिसांत धाव घेतली व पती शशिकांत केंदाळे, शीतल बागूल (उल्हासनगर), लताबाई(विठ्ठलवाडी), तायराबाई (सिंधी कॅम्प, चेंबूर, मुंबई), सनी यांच्याविरोधात फिर्याद दिली. (प्रतिनिधी)