शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण सुरूच

By admin | Updated: February 12, 2016 01:43 IST

गोरेगाव चित्रनगरीतून हद्दपार करू नये म्हणून बुधवारपासून पत्नीसह उपोषणाला बसलेल्या उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. उपाहारगृहात कोंडून

मुंबई : गोरेगाव चित्रनगरीतून हद्दपार करू नये म्हणून बुधवारपासून पत्नीसह उपोषणाला बसलेल्या उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. उपाहारगृहात कोंडून घेतलेल्या गायकवाड यांची प्रकृती खालावली आहे; शिवाय त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने कधीही हृदयविकाराचा झटका येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.गायकवाड यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी व्यक्त केली. या वेळी चित्रनगरीचे सहसंचालक उपस्थित होते. दरम्यान, डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या भीतीमुळे गायकवाड यांच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी गायकवाड यांची भेट घेतली. सरकारविरोधातील या लढ्यात मुंडे यांनी गायकवाड यांना पाठिंबाही दर्शविला. सांस्कृतिकमंत्र्यांकडून गायकवाड यांच्यावर करण्यात येत असलेल्या कारवाईचा मुंडे यांनी निषेध केला. न्यायालयाचा मान राखण्याचे कारण देणारे तावडे गायकवाड यांना वेगळा आणि हेमा मालिनी व सुभाष घई यांना वेगळा न्याय का देत आहेत, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला.गायकवाड यांनी स्वत:ला कोंडून घेतल्याची घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गुरुवारी विविध संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींसह विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. ‘लढा सुरू ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकसभेतही अन्यायाला वाचा फोडू,’ असे आश्वासन काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिले. खरगे लवकरच मुंबईत येऊन गायकवाड यांची भेट घेणार असल्याचेही सांगितले.