शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील न्यायालयात वकिलांचा राडा

By admin | Updated: August 26, 2016 20:59 IST

न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन देऊनही एका वकिलाला पौड पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांनी गोंधळ घातला.

ऑनलाइन लोकमत
 
पुणे, दि. 26 -  न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन देऊनही एका वकिलाला पौड पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर न्यायालयात वकिलांनी गोंधळ घातला. जामीन मिळालेल्या वकीलाची अटक बेकायदेशीर असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर विशेष न्यायाधीश मंगला धोटे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना सोमवारी न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅड. आकाश मारणे यांच्याविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. मारणे यांनी अटकपुर्व जामिनासाठी अ‍ॅड. विशाल दुशिंग यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना जामीनही मंजूर केला होता. पोलीस उपनिरीक्षक एन. एस. मोरे यांनी मारणेंच्या वडीलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत मारणेला हजर राहण्यास सांगत मारहाण केली होती. मारणे यांनी आपल्याला अटकपुर्व जामीन मंजूर असल्याचे सांगूनही ते हजर झाल्याशिवाय वडीलांना सोडणार नसल्याची भुमिका पोलिसांनी घेतली. 
जेव्हा मारणे पोलीस ठाण्यामध्ये गेले तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. अ‍ॅड. दुशिंग यांनीही पोलीस ठाण्यात दुरध्वनी करुन मारणेंना अटकपुर्व जामीन मंजूर झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे अ‍ॅड. दुशिंग यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन पुन्हा माहिती दिली. पोलिसांना माहिती देऊनही मारणेंना अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
या सर्व प्रकारामुळे शिवाजीनगर न्यायालयातील संतप्त झालेले वकील उपनिरीक्षक मोरे यांना मारहाण करण्याच्या मनस्थितीत होते. परंतु, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. गिरीश शेडगे, अ‍ॅड. एन. डी. पाटील, अ‍ॅड. मिलिंद पवार आदी वरिष्ठ वकिलांनी स्वत: संरक्षण देत मोरे यांना न्यायालयात नेले. मारणे यांनी अर्ज करुन आपली अटक बेकायदा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मारणे यांच्या मार्फत दाखल करण्यात आलेल्या वकीलपत्रावर १५० पेक्षा अधिक वकिलांनी सह्या केल्याचे अ‍ॅड. दुशिंग यांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाने उपअधीक्षकांना नोटीस बजावली असून मारणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या जामीनासाठी अर्ज करण्यात आला आहे.