शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू सणांनाच कायदे आडवे येतात

By admin | Updated: July 6, 2017 04:45 IST

सायलेन्स झोन असो की,अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सायलेन्स झोन असो की,अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव पूर्वीपासूनच आहे. शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी आहे. गणेशोत्सव दणक्यात साजरा करणारच, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावले. मंत्रालयासमोरील क ४ या सरकारी बंगल्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दरवर्षी पावसापाठोपाठ हिंदूंचे सण मग गणेशोत्सव असो, नवरात्रौत्सव असो की दिवाळी वातावरण तापू लागते. रेड अलर्ट जारी होतो, अतिरेकी हल्ल्याच्या सूचना येतात. कायदे आडवे येतात, अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन सण साजरे करणाऱ्या हिंदूंवरच कायद्याचा बडगा उगारला जातो. यावर सरकार कायमस्वरूपी तोडगा का काढत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला. गणेशोत्सवावर अनेक बंधने लादण्यात आली आहेत. यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक होणार आहे. या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर शिवसेना हा उत्सव दणक्यात साजरा करणार, असे त्यांनी बजावले. गणेशोत्सव साजरे करणारे अतिरेकी नाहीत. त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. ते चुकत असतील तर त्यांना समजवून सांगा, असे आवाहन त्यांनी केले.शेतकरी संवाद ९ पासूनमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुुंबईतील शेतकऱ्यांची नावे आहेत. हे जरी ऐकायला विचित्र असलं तरी खातरजमा करायला काय हरकत आहे. त्याचवेळी सातबारा कोरा झालेले ४० लाख शेतकरी आणि कर्जमाफी योजनेचा लाभ झालेल्या अन्य ४९ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान उद्धव यांनी सरकारला दिले.भाजपाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची शक्यता असल्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ‘शेवटी ते ठरवतील तो वाल्या आणि ते ठरवतील तो वाल्मीकी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.थेट सरपंच निवडीस विरोधनगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयाला शिवसेनेने पाठिंबा दिला. मग उद्या मुख्यमंत्रीपण थेट जनतेतून निवडणार काय? कोणताही निर्णय घेताना आधीच्या निर्णयाचा आढावा घ्यायला हवा. सरपंच वा नगराध्यक्ष वेगळ्या विचारांचा निवडून आला की त्या ठिकाणी मतभेद होतात. त्याचा दुष्परिणाम शेवटी त्या-त्या पक्षाला भोगावे लागतात. तेव्हा सरकारने याबाबत योग्य निर्णय घ्यायला हवा, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.