शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांच्या बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करणार

By admin | Updated: January 15, 2016 01:56 IST

खासगी रुग्णालयांची बिल अवास्तव व सामान्यांच्या खिशाला न परवडणारी असल्याने, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे, असे म्हणत सरकारी

मुंबई : खासगी रुग्णालयांची बिल अवास्तव व सामान्यांच्या खिशाला न परवडणारी असल्याने, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे, असे म्हणत सरकारी वकिलांनी महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट (रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन्स) अ‍ॅक्ट, २०१४ चा मसुदा उच्च न्यायालयापुढे सादर केला.बिलाच्या वादामुळे भावाला जबरदस्तीने डांबण्यात आल्याने सेव्हन हिल्सच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी संजय प्रजापती यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते- ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती. प्रजापती यांच्या भावाला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे योग्य उपचार न झाल्याने संजय यांनी त्यांच्या भावाला अन्य रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज देताना बिलाचा आकडा फुगवला. ते बिल देण्यास नकार दिल्याने, रुग्णालयाने भावाला सोडण्यास नकार दिला, असे प्रजापती यांनी याचिकेत म्हटले आहे. ‘बिल न दिल्याने रुग्णाला डांबण्याचे प्रकार वाढत आहेत,’ असे निरीक्षण नोंदवत, खंडपीठाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना आखणार? अशी विचारणा सरकारकडे केली. सरकारी वकील मनकुंवर देशमुख यांनी खासगी, सरकारी व महापालिका रुग्णालयांच्या बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट (रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन्स) अ‍ॅक्ट, २०१४ चा मसुदा तयार करण्यात आला आहे, असे म्हणत खंडपीठापुढे मसुदा सादर केला. हा मसुदा वाचल्यानंतर खंडपीठाने या मसुद्याचे कायद्यात रूपांतर केव्हा होणार? अशी विचारणा सरकारकडे केली. येत्या दोन आठवड्यात या संबंधी माहिती देऊ, असे आश्वासन अ‍ॅड. देशमुख यांनी खंडपीठाला दिले. बिलाचे पैसे न दिल्याने रुग्णाला कोणी डांबू नये, रुग्णालयाला आर्थिक नुकसानही होऊ नये, असा तोडगा काढणे आवश्यक आहे,’ असे खंडपीठाने म्हटले. कंपनी कायद्यात सुधारणा कराकाही लोक इतके आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात की, ते रुग्णालयाच्या बिलाची रक्कमही देऊ शकत नाहीत, असे म्हणत खंडपीठाने कंपनी कायद्यात सुधारणा करण्याची सूचना सरकारला केली. खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी दोन आठवडे तहकूब केली आहे.कॉर्पोरेट कंपन्यांनी मदत करावी‘रुग्णालयाचे बिल न देऊ शकणाऱ्या गरजूंसाठी कॉर्पोरेट्सने त्यांच्या वार्षिक उत्पन्नातील दोन टक्के उत्पन्न ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ म्हणून द्यावे. यामुळे गरीब रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना मदतही होईल.रुग्णालायाला त्यांचे पैसेही मिळतील. त्यासाठी कंपनी कायद्यात अशी सुधारणा करणे आवश्यक आहे,’ असे म्हणत खंडपीठाने याबाबत सरकारला विचार करण्यास सांगितले.