शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लावणीचा बाज, अदाकारी हरवली

By admin | Updated: April 27, 2015 23:29 IST

लीला गांधी : हिंदीचे अनुकरण मराठीला मारक

संतोष मिठारी - कोल्हापूरगाण्यांचा अर्थ अदाकारीतून पेश करत त्याला लक्षवेधक नृत्याची जोड देण्याची कला म्हणजे लावणी आहे. तिला एक अस्सल मराठमोळा बाज होता. मात्र, प्रेक्षकांच्या बदललेल्या अभिरूचीमुळे मऱ्हाटमोळ्या लावणीचा बाज, अदाकारी आता हरवल्याची खंत ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी सोमवारी व्यक्त केली. मराठी चित्रपटांमध्ये हिंदीचे वाढलेले अनुकरण हे वेगळंपण जपलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला मारक ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.भगिनी पुरस्कार सोहळ्यासाठी कोल्हापुरात त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेत्री गांधी म्हणाल्या, लावणीमध्ये नृत्य आणि गाण्यांचा अर्थ सांगणारे चेहऱ्यावरील हावभाव आणि अदाकारीला महत्त्व आहे. या दोन गोष्टींचा उत्तम संगम म्हणजे लावणी आहे. त्याच्या जोरावरच लावणी अस्सल मराठमोळ्या बाजात सादर होत होती. मात्र, सध्या लावणीतील शब्द कुठे जात आहेत ते समजत नाहीत. त्यातील अर्थाची जागा धांगडधिंग्याने घेतली आहे. चेहऱ्यावरील हावभाव बदलले असून अदाकारी गायब झाली आहे. प्रेक्षकांची बदललेली अभिरूची त्याला कारणीभूत आहे. बदलत्या जगानुसार लावणी बदलत आहे. त्यात अदाकारी, बाज असलेली लावणी लोप पावत आहे. या लावणीची आवड प्रेक्षकांमध्ये रूजविण्यासाठी गाण्यांच्या शब्दांवर नृत्य, अदाकारी सादर करणे गरजेचे आहे. चित्रपट, लावणीमधील येणाऱ्या नव्या मुलींचे नृत्यकौशल्य चांगले आहे. पण, त्याला शास्त्रीय पाया नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. मराठी चित्रपटांमधील बदलांबाबत त्या म्हणाल्या, पूर्वी पैसे कमी असल्याने मराठीत कसे-बसे दोन-चार चित्रपट व्हायचे. आता परिस्थिती बदलली असून चित्रपटांची संख्या वाढली आहे. पण, त्यात हिंदीचे अनुकरण होत आहे. कपडे, भूमिका, अभिनयातील ‘बोल्डनेस’ यामुळे हिंदीचे अनुकरण खटकणारे आहे. त्यामुळे चित्रपट धडाधड येत असले, तरी ते त्याहून अधिक वेगाने विस्मृतीत देखील जात आहेत. (प्रतिनिधी)अनंत माने यांच्या नावाने पुरस्कार द्यावाख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने मराठी चित्रपटसृष्टीला यांनी भरभरून दिले. ते कोल्हापूरचे भूषण होते. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाने त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री गांधी यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, अशोककुमार यांच्यासमवेतचा आशीर्वाद, महिपालबरोबरचा ‘बगदाद की राते’, हेलनसोबतचा ‘बस कंडक्टर’ या हिंदी चित्रपटांत मी काम केले. मराठीतील ‘रेशमाच्या गाठी’साठी आॅडिशन देण्यासाठी गेले असताना अनंत माने यांनी नृत्यकौशल्य पाहून ‘प्रीतीसंगम’मधून संधी दिली. शांताराम बापूंपाठोपाठ त्यांचे कार्य आहे. जन्मशताब्दी वर्षात त्यांचे कोल्हापुरात स्मारक व्हावे. त्यासाठी यशाशक्ती मदत मी करेन.सातासमुद्रापार जाऊन उपयोग काय?आता काही नृत्यांगणा सातासमुद्रापार असलेल्या अमेरिका आदी देशांत लावणीचे धडे देण्यासाठी जात आहेत. ते चांगले आहे. पण, लावणीचे धडे देणाऱ्यांना नेमकी लावणी माहीत नाही. चित्रपटांतील गीतांचा समावेश, पेहराव्यातील बदलाने लावणीचा मूळ बाज गायब झाला आहे. अशा स्वरूपातील लावणी सातासमुद्रापार जाऊन उपयोग काय?, असा सवाल ज्येष्ठ अभिनेत्री गांधी यांनी उपस्थित केला.