पालघर : भातशेतीमध्ये जाणवणारा मजुरांचा तुटवडा, त्यांचा वाढता खर्च, व महिलांना दिवसभर कराव्या लागणाऱ्या कष्टावर मात करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या भातलागवड यंत्राचे वाटप करण्यासाठी जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले यांच्या हस्ते गांजे-ढेकाळे येथील महिला स्वयंसहाय्यता गटाना करण्यात आले.जिल्हापरिषदेचा कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हयात भातलागवडीचे यंत्र महिला स्वंयसाहाय्यता गट व ग्रामसंघ यांना ५० टक्के अनुदानावर वाटप होत आहे. यंत्राने अडीच तासामध्ये एका एकराची लागवड पूर्ण होते. बियांणाचीही ६० टक्के बचत होते. या वर्षासाठी ५० यंत्रे ७५ टक्के अनुदानावर देण्यात येतील असे कृषी सभापती अशोक वडे यांनी सांगितले. तसेच न्युक्लिअर बजेटमधून स्वंयसाहाय्यता गटाच्या ग्रामसंघाला भातलावणीयंत्र, पॉवर टीलर, गवतकाढणी यंत्र, छोटी राईस मिलचे वाटप होणार असल्याचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जेजुरकर यांनी सांगितले.कृषी सभापती अशोक वडे, बांधकाम सभापती सुरेश तरे, महिला बालकृष्ण सभापती विनीता कोरे, समाजकल्याण सभापती गोवारी, जि.प. सदस्य जीवन सांबरे, सरपंच दर्शना पराड, कृषी अधिकारी राकेश वाणी, योगेश भामरे, एसटी पाटील, संखे, इ.नी स्वत: या भातलागवडी यंत्राचे प्रात्याक्षीक शेतातील चिखलात उतरून शेतकऱ्यांना करून दाखविले.(वार्ताहर)
बचतगटांना लावणी यंत्र
By admin | Updated: July 31, 2016 02:56 IST