शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड'चं कलर्स वाहिनीवर प्रक्षेपण

By admin | Updated: February 25, 2017 20:32 IST

कलर्स मराठीवर 26 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता 'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड' सोहळ्याचं प्रक्षेपण होणार आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - राजकारण, प्रशासन आणि समाजकारण यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांच्या उपस्थितीत जुहूच्या जे. डब्लू मॅरियट या आलिशान हॉटेलात पार पडलेल्या कॉटनकिंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्र मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड सोहळ्याचं प्रक्षेपण टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठीवर 26 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता या सोहळ्याचं प्रक्षेपण होणार आहे. 
 
तसंच एबीपी माझावर 27 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान हा अॅवॉर्ड सोहळा पाहता येणार आहे. दुपारी 12.30 आणि 4.30 वाजता प्रसारित होणा-या 'घे भरारी' कार्यक्रमात या अॅवॉर्ड सोहळ्यातील क्षण पाहण्यास मिळणार आहेत. हा अ‍ॅवॉर्ड सोहळा अनेक मराठी आणि हिंदी तारे-तारकांनी गाजवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या शानदार समारंभात विविध क्षेत्रांमधील मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटीजना अ‍ॅवॉर्ड देण्यात आले.
 
३१ जणांना लोकमतने महाराष्ट्राज स्टायलिश अ‍ॅवार्डने गौरविले होते. अमृता फडणवीस याही त्यांच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे ओळखल्या जातात. त्यामुळे त्याही विजेत्या होत्या. पण त्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅवार्ड स्वीकारला. प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांना स्टायलिश जीवनगौरव अ‍ॅवॉर्ड देण्यात आला, तेव्हा मला आयुष्यात आणखी खूप काही करायचे आहे, असे ते गंमतीने म्हणाले.
 
आदित्य ठाकरे यांना अ‍ॅर्वार्ड दिल्यानंतर त्यांची जी छोटेखानी मुलाखत ऋषि दर्डा यांनी घेतली. त्यात त्याने स्टाईलविषयीच्या आपल्या कल्पना सांगितल्या आणि या आगळ्या अ‍ॅवॉर्डबद्दल लोकमतचे कौतुकही केले. ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर यांना त्यांच्या स्टाइलविषयी बोलते केले. क्रिकेटव्यतिरिक्त हा माझा पहिला अ‍ॅवॉर्ड आहे, असे अजिंक्य रहाणे म्हणाला. या अ‍ॅर्वार्डमुळे मला स्टायलिश राहावे लागेल, असेही तो हसतच म्हणाला. सुयश टिळक व क्रांती रेडकर यांनी या रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
 
- लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त करताना, दिग्गजांच्या उपस्थितीबद्दल त्या सर्वांचे आभार मानले. लोकमतवरील प्रेमापोटीच तुम्ही आला आहात, असे ते म्हणाले. लोकमत हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर या देशातील सर्वाधिक खपाचे दैनिक आहे.