शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुविधादालन उपक्रम सुरू

By admin | Updated: May 18, 2016 01:31 IST

‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम कौतुकास्पद आहे. या पार्श्वभूमीवर, नगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सुविधादालन उपक्रम राबविला आहे.

बारामती : नागरिक आणि प्रशासनाच्या समन्वयासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम कौतुकास्पद आहे. या पार्श्वभूमीवर, नगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सुविधादालन उपक्रम राबविला आहे. त्यातून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेण्याचा उद्देश आहे, असे नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितले.बारामती येथे ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. जगताप म्हणाले, सुमारे ५५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या शहराचे तीनशे ते सव्वातीनशे कोटींचे बजेट आहे. यातून शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. वाढीव हद्दीतील रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. पाणीपुरवठ्याच्या सक्षम नियोजनामुळे२ लाख लिटर दैनंदिन पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. ८५ टक्के भूमिगत गटारांचे काम पूर्ण केले आहे. मागेल त्याला ‘ड्रेनेज’ देणार आहे. दलितवस्तीसाठी अधिकचा निधी उपलब्ध केला जाईल. बारामती शहरातील खराब पाणी झाडांना देऊन उर्वरित पाणी शेतकऱ्यांना देण्यात येईल. शहरात तालुकास्तरावर प्रथमच ‘ओपन जिम’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. प्लॅस्टिक न वापरण्याची नागरिकांनी प्रतिज्ञा करावी. ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले म्हणाले, सकारात्मक समन्वयासाठी ‘लोकमत’चा विविध उपक्रमांतून नेहमीच पुढाकार असतो. शहरात नगरपालिका प्रशासनाने समतोल विकास साधला आहे. पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा शहरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. ‘लोकमत’मुळे रेशनिंग दुकानातील भ्रष्टाचार उघडकीस आल्याचे सतीश गावडे यांनी नमूद केले. बोगस कागदपत्रे उघडकीस आली; त्यामुळे संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आल्याचे ते म्हणाले. >गळती थांबवावी : प्रशासनाला आवाहन माजी उपनगराध्यक्ष संजय संघवी म्हणाले, गेली ६ वर्षे जुन्या साठवण तलावातून कोट्यवधी लिटर पाण्याची गळती झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून गळती थांबविणे गरजेचे आहे. राज्यात तीव्र दुष्काळ असताना पाण्याची गळती होणे योग्य नाही. नवीन तंत्रज्ञानाने कोयनेतील गळती थांबविण्यास यश आले; त्यामुळे या तलावातील गळती थांबविण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा. गळतीमुळे कोट्यवधी लिटर पाणी वाया गेले. त्यासाठी संबंधित ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाने कोणती कारवाई केली? शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी रस्ते होणे आवश्यक आहे. निर्जन ठिकाणी रस्ते झालेले नाहीत. हरिकृपानगर परिसरातील रस्त्यांना न्याय देण्याची मागणी आहे. यावर नगराध्यक्ष जगताप यांनी, हरिकृपानगरच्या रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी (दि. १७) ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत संजय संघवी यांच्या तोंडी प्रसिद्ध झालेले वक्तव्य वस्तुत: माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांचे होते.