शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी लातूरकर आले एकत्र

By admin | Updated: April 12, 2016 01:51 IST

अभूतपूर्व पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लातूरमधील मंडळी एकत्र आली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. अशोक कुकडे, काँग्रेसचे अ‍ॅड. त्र्यंबक झंवर, समाजवादी चळवळीचे

लातूर : अभूतपूर्व पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लातूरमधील मंडळी एकत्र आली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. अशोक कुकडे, काँग्रेसचे अ‍ॅड. त्र्यंबक झंवर, समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड. मनोहर गोमारे आणि साखर कारखानदार व यशस्वी उद्योजक बी. बी. ठोंबरे या सर्वांनी ‘जलयुक्त लातूर’ची हाक दिली आणि बघता-बघता मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी केवळ सहा दिवसांत तीन कोटी रुपयाचा निधी उभा राहिला.सरकार करेल तेव्हा करेल, पण आपण आपले काम केले पाहिजे या विचाराने प्रेरित श्री. श्री. परिवाराच्या कार्यकर्त्यांनी हाक दिली. त्यांनी एक समविचारी मंडळाचे पॅनल केले. त्यात सर्वच पक्ष आणि कार्यकर्त्यांची सांगड घातली. मांजरा नदीवरील साई बंधारा-नागझरी बंधारा ते सारसा पोहरेगाव बंधाऱ्यापर्यंत खोलीकरणास सुरुवात झाली आहे. या लोकचळवळीसाठी सात कोटींचा खर्च अपेक्षित असताना अवघ्या आठवडाभरात तीन कोटी निधी लोकसहभागातून जमा झाला आहे. विशेष म्हणजे उद्घाटन झालेल्या गुढीपाडव्याच्या दिवशीच लोकांनी दोन कोटी रुपये दिले. मांजरा नदीमध्ये एकूण २८ बॅरजेस आहेत. त्यातील साई आणि नागझरी या दोन ठिकाणांहून लातूर शहराला पाणीपुरवठा होतो. या दोन्ही बंधाऱ्यात पाणी थांबते ते पात्र १८ किलोमीटरचे आहे. याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून ४३ लाख घनमीटर गाळ बाहेर काढण्यात येणार आहे.आधी पाणी, मग विचारधाराआम्ही सर्व सहकारी वेगवेगळ्या विचाराधारांचे आहोत, ही बाब खरी आहे. पण सामान्य लातूरकरांची पाणी ही गरज पहिली आहे, विचारधारा नंतर. - अ‍ॅड. त्र्यंबक झंवरसर्वांनीच दिले पैसेलातुरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हॉटेलवाल्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वजण सरसावले आहेत़ त्यामुळे जलयुक्त लातूर या उपक्रमासाठी दिवसेंदिवस निधी वाढत आहे़. - अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे