शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये जलसंकट !

By admin | Updated: February 22, 2016 04:17 IST

साडेपाच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करणारे सर्व जलस्रोत आटल्यामुळे लातूर शहरात पाण्यावरून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून, अख्खं शहर उठण्याची भीती निर्माण झाली आहे.

- दत्ता थोरे,  लातूर साडेपाच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करणारे सर्व जलस्रोत आटल्यामुळे लातूर शहरात पाण्यावरून आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून, अख्खं शहर उठण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्यावाचून उद्योगधंदे बंद पडल्याने आतापर्यंत सुमारे ५० हजार मजुरांनी स्थलांतर केले आहे, तर विद्यार्थी वसतिगृहे, दवाखान्यातील आॅपरेशन थिएटर बंद ठेवण्याची पाळी आली आहे. सरकारने वेळीच उपाययोजना हाती घेतली नाही, तर मोठा जनउद्रेक होऊ शकतो. लातुरात ही स्थिती असतानाच पाणीटंचाईने दोन शालेय विद्यार्थ्यांचा बळी घेतल्याची घटना अहमदपूर तालुक्यात रविवारी घडली. लातूर शहराला मांजरा नदीवरील नागझरी येथील साई बंधारे व बीडमध्ये मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. साई बंधाऱ्याची १.४७ दलघमी तर मांजरा धरणाची ४४५ दलघमी क्षमता. साई अपुरे पडत असल्याने १२ वर्षांपूर्वी कायमस्वरूपी योजना म्हणून मांजरा धरणावरून ११२.६६ कोटी खर्चून योजना पूर्णत्वास नेली. परंतु लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला नाही. यंदा फेब्रुवारीतच दोन्ही जलस्रोत कोरडे पडल्याने १५ दिवसांतून एकवेळ येणारे पाणीही बंद झाले. ‘आजपासून नळाला पाणी येणार नाही,’ अशी ‘अभूतपूर्व’ घोषणाच करण्याची पाळी पालिकेवर आली. साई बंधाऱ्यात खोदलेल्या चरांमधून पाच दिवसातून प्रतिकुटूंब २०० लिटर पाणी ७० टँकरद्वारे पुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने आखले, पण अवघ्या आठ दिवसात या नियोजन कोलमडून पडले. बलवान नगरसेवकांनी जलकुंभावर कब्जा करून खासगी टँकरच्या माध्यमातून ‘खरी कमाई’ सुरू केली आहे.गेल्या चार-पाच वर्षापासून टंचाईची स्थिती असल्याने शहरात तब्बल २० हजार बोअर पाडून जमिनीची चाळण करून टाकली गेली. आजमितीला त्यापैकी केवळ हजारभर बोअर चालू आहेत. त्यावर १२०० हून अधिक टँकर्स सुरू असून एका टँकरचा भाव दीड हजाराच्या पुढे गेला आहे. बाटल्या, जार आणि टँकरची ही उलाढाल दररोज ४० लाखाच्या घरात आहे. फेब्रुवारी महिन्यातच ही आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मे मध्ये काय होईल? काही दानशूर वाढदिवसाला फळे वाटावीत तसे पाणी वाटपाचे कार्यक्रम करून तेवढेच ‘पुण्य’ पदरात पाडून घेत आहेत.लातूर एमआयडीसीतील दोन हजार उद्योगांपैकी ५०० हून अधिक छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांना आपल्या धंद्याला कुलूप लागले लागले आहे. एमआयडीसीला महिन्यातून एकदा अर्धा तास सुटणारे पिण्याचे पाणीही बंद झाले आहे. लातुरात डाळ मिल, तेल मिल मोठ्या संख्येने आहेत. ते सर्व उद्योग बंद पडल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.लातूर शहरात गेल्या वर्षभरापासून बांधकाम परवाने देणे बंद झाले आहे. परिणामी, बांधकामासह त्यावर अवलंबून असलेल्या पाच हजार उद्योगधंदे आणि ४० हजार बांधकाम मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समिती, व्यापार पेठ, औद्योगिक वसाहत ओस पडल्याने सुमारे पन्नाह हजार मजुरांनी दुसऱ्या शहराकडे स्थलांतर केले आहे. उजनी योजना मंजूर करावी : महापौर लातूरच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे आम्हाला उजनीहून पाणी द्यावे,असे महापौर अख्तर शेख यांचे म्हणणे आहे.नियोजन चालू आहे सर्व जलस्रोत आटल्याने माकणी धरणाहून पाणी टँकरने आणायचे नियोजन आहे. शिवाय, मिळेल तिथून टँकरद्वारे पाणी आणावे लागेल, असे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले.सरकारने लातूरकरांना फसविले ! लातूरच्या पाण्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही. आॅगस्टमध्ये दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला उजनीहून रेल्वेने पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने ना रेल्वेमंत्र्यांकडे हक्क मागितला ना पाणीपुरवठा मंत्र्यांकडे. शेवटी मुख्यमंत्री दौऱ्यात उस्मानाबादच्या उजनीहून आलेल्या पाइपलाइनने ८ एमएलडी पाणी उपसून लातूरला देण्याचे ठरले. तेही हवेत विरले.माकणीहून साडेतीन एमएलडी पाणी लातूरला आणण्यासाठी नवा प्रस्ताव गेला, पण त्यालाही मंजुरी मिळाली नाही. आता पालकमंत्री म्हणतात, आहे ते पाणी जपून वापरा. जपायला पाणी आहेच कुठे, असा लातूरकरांचा सवाल आहे. वसतिगृहे उठली; शस्त्रक्रियाही बंद! : शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या पॅटर्नमुळे शहरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे थाटली गेली आहेत. परंतु पाण्याअभावी सरकारी आणि खासगी वसतिगृहे बंद करण्यात आली आहेत. शाळा-महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना विकत पाणी घ्यावे लागते. या पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसत आहे. पाण्याअभावी खासगी आणि शासकीय दवाखान्यातील आॅपरेशन थिएटर बंद ठेवावे लागत आहे. मांजरा धरण ३५ वर्षांत १३ वेळाच भरले!बीड जिल्ह्यातील मांजरा धरण ३५ वर्षांच्या काळात १३ वेळाच १०० टक्के भरले. अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये असल्याने त्याची भरण्याची शक्यताच कमी आहे. यंदा फेब्रुवारीतच आटलेल्या धरणाने लातूरकरांच्याच नव्हे, तर यावर विसंबून असलेल्या कळंब, शिराढोण, मुरूड, केज, अंबाजोगाई, लातूर एमआयडीसी अशा पाच शहरांसह ४२ गावांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.