शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या खासदारांना अपमानास्पद वागणूक प्रकरणी दोघांना केले निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 21:56 IST

भाजपाचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सदन कँटीनमधील दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपाचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सदन कँटीनमधील दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले असून कँटीन मालकाला १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी ही कारवाई केली आहे.गायकवाड हे सोमवारी संसदेच्या अधिवेशनासाठी नवी दिल्लीला गेले होते. दुपारी ते महाराष्ट्र सदनमध्ये गेले. खासदार व आमदारांसाठीच्या कक्षामध्ये तेव्हा कोणाची तरी पार्टी सुरू होती. त्यामुळे ते सामान्य कक्षात गेले. तेव्हा काऊंटर मॅनेजरने त्यांना, कुठेतरी बसा असे सांगितले. त्यावर त्यांनी मी खासदार असल्याचे सांगितले. गायकवाड हे सरळ एका रिकाम्या टेबलाकडे गेले. मात्र एक वेटर तेथे आला व हा टेबल बुक असल्याचे त्याने सांगितले. खा. गायकवाड यांना वेटरने तेथे बसू दिले नाही. तब्बल अर्धा तास त्या टेबलाकडे कोणीही आले नाही. तरीही गायकवाड बसू देण्यात आले नव्हते. याविरोधात कँटीन प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी खा. गायकवाड यांनी अभिप्राय पुस्तिकेत केली होती.

या आधीही झाला होता वाद

2014 मध्ये रमजानच्या महिन्यात महाराष्ट्र सदनात एका मुस्लीम कर्मचा-याला बळजबरीने चपाती खायला लाऊन त्याचा रोजा मोडल्याचे प्रकरण झाले होते. महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळणारी वागणूक, राहण्याची व खाण्यापिण्याची निकृष्ट दर्जाची सोय यामुळे संतापलेल्या शिवसेना खासदारांनी सदनातील कर्मचा-याला बळजबरीने चपाती भरवली होती. मात्र तो कर्मचारी मुसलमान होता व तेव्हा त्याचा रमजानचा उपवास सुरू असल्याने या प्रकरणी मोठा गदारोळ माजला होता. भाजप-शिवसेनेचे नवनियुक्त खासदार निवडून आल्यापासून नवीन महाराष्ट्र सदनात वास्तव्य करत होते. मात्र त्यांना तेथे चांगल्या सोयी-सुविधा दिल्या जात नव्हत्या. या गैरसोयींवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे खासदार महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना वारंवार भेटण्याचा पयत्न करीत होते. मात्र, निवासी आयुक्तांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. एकदा मलिक यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली मात्र ते भेटलेच नाहीत. यामुळे त्यांच्यावरील राग कँटीनच्या मॅनेजरवर निघाला. जेवण नीट नसल्यामुळे सेनेचे खासदार राजन विचारे यांनी मॅनेजरला बोलावले आणि पोळी खावून दाखविण्यास सांगितले. त्याने पोळी खाल्ली नाही म्हणून विचारे यांनी स्वतः मॅनेजरच्या तोंडाला पोळी लावली. मात्र तो मुस्लीम असून त्याने रोजा ठेवला आहे याची माहिती त्यांना नव्हती. रोजाचा उपवास मोडल्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ माजला. विरोधकांनी या मुद्यावरून संसदेचे कामकाजही बंद पाडले होते.