शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाड आडनावामुळे लातूरच्या खासदाराला विमानप्रवासात कटकटी

By admin | Updated: March 30, 2017 18:17 IST

रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवास बंदी घातल्यानंतर त्याचा नाहक फटका लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना बसतो आहे.

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 30 - विमान कंपन्यांनी उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवास बंदी घातल्यानंतर त्याचा नाहक फटका लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना बसतो आहे. रवींद्र गायकवाड विमानात घुसण्याच्या भीतीने त्रस्त झालेल्या विमान कंपन्यांचे कर्मचारी खासदार गायकवाड म्हटले की लातूरच्या खासदारांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवित आहेत. हे ते तर गायकवाड नाहीत ना ? अशी शंका विमानाचे तिकीट बुक करणाऱ्यांपासून ते कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांपर्यंत साऱ्यांचाच चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. या विनाकारण चौकशीचा वैताग आला आहे, अशा शब्दात खा. सुनील गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया लोकमतशी बोलताना दिल्या. उस्मानाबादच्या खासदार गायकवाडांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना चपलेने मारहाण केल्यानंतर त्यांचा विमान प्रवासावर बंदी आली. ते सुरुवातीला रेल्वेने आणि आता बाय रोड प्रवासाला प्राधान्य देताहेत. मात्र त्यांचे आडनाव धारण केलेल्या लातूरच्या खासदार सुनील गायकवाडांना विमान प्रवास करताना गायकवाड आडनावाचा फटका बसतो आहे. तिकीट बुक करताना हे आडनाव ऐकले की बुकिंगवालेच कोणते गायकवाड? सुरुवातीचे नाव काय? काय करता? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत आहेत. विमान कंपन्यांचे अधिकारीच काय तर सुरक्षारक्षकही त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. विमानतळावर गेले की मला गायकवाड आडनावामुळे सारे शंकेने पाहात आहेत. तिकीट बुक करताना हाच अनुभव येतो. कोणते गायकवाड? तुमचा व्यवसाय काय? तुम्हीसुद्धा खासदार आहात का? कुठले खासदार आहात? असे नाहक प्रश्न विचारले जातात. बोर्डिंग पास घेतानाही तेच. वा विमानतळावर गेल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व सुरक्षारक्षक माझ्या गायकवाड असण्यावर नको त्या चौकशा करतात. चौकशीच्या नावाखाली विनाकारण थांबवून ठेवले जाते. उभे केले जाते. खिशातले सर्व साहित्य बाहेर काढून तो गायकवाड मी नाही हे समाजावून सांगावे लागते. मी तर काही गुन्हा केला नाही ? मग मला अशी वागणूक का ?, असा सवालही खासदार सुनील गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.