शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा लांबला तरच लातूरला रेल्वेने पाणी

By admin | Updated: March 29, 2016 21:06 IST

लातूरवासीयांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा विचार केला जात आहे. परंतु उपलब्ध होत असणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने ते जून अखेरपर्यंत पुरू शकते.

उपलब्ध साठा जूनअखेर पुरवणार : वितरणाचे काटेकोर नियोजन

लातूर : लातूरवासीयांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा विचार केला जात आहे. परंतु उपलब्ध होत असणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने ते जून अखेरपर्यंत पुरू शकते. त्यामुळे पावसाळा लांबला तरच उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणावे लागेल. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ त्यावर मात करण्यासाठी १ हजारपेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ शिवाय, २६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ सद्य स्थितीत भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध आहे़ तेथील स्थानिक लोकांची गरज, प्रकल्पातील गाळ, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यासही जून अखेरपर्यंत लातूर शहराला पाणी पुरु शकते़ त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे़ मांजरा, साई, नागझरी प्रकल्पामध्ये चर खोदण्यात येत असून त्याद्वारेही पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. टंचाईचा तीव्र काळ फेबु्रवारी, मार्च होता़ उपाययोजना केल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे़ उपलब्ध पाण्याचे सुक्ष्म नियोजन केल्याने पाऊस वेळेवर पडल्यास संकट टळेल आणि रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही, असेही पोले यांनी सांगितले.रेल्वे वाहतुकीसाठी १८ तासांचा कालावधी लातूर-बार्शी-कुर्डूवाडी-पंढरपूरहून किमान ३० ते ३५ हजार लिटर क्षमतेचे १५ ते २० टँकर (वाघिणी) जोडून ते पाणी लातूरला आणण्याचा हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे़ एका खेपेत ७ ते ८ लाख लिटर्स पाणी आणण्याचा हा प्रस्ताव असून, या प्रक्रियेला किमान १८ तासांचा कालावधी लागेल़ या कालावधीत रेल्वे ट्रॅक कुठला रिकामा राहू शकतो किंवा कोणता ट्रॅक सोयीचा आहे, याबाबतचा विचार शासन पातळीवर सुरु आहे़- पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी-लातूर