शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

चित्रपटाच्या नावाखाली लाटले अनुदान

By admin | Updated: February 6, 2016 03:28 IST

चित्रपटाच्या नावाखाली शासनाचे १० लाखांचे अनुदान लाटणाऱ्या अजित सारंग याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे

मुंबई : चित्रपटाच्या नावाखाली शासनाचे १० लाखांचे अनुदान लाटणाऱ्या अजित सारंग याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. तुकडोजी महाराज यांच्यावर चित्रपट तयार करण्यासाठी शासनाकडून त्याच्या संस्थेला पहिल्या टप्प्यात १० लाखांचे अनुदान देण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित सारंग प्रॉडक्शनने २००५ साली तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ५० लाखांचे अनुदान मंजूर करून घेतले. त्यापैकी १० लाख रुपयांचा पहिला हप्ता त्याला शासनाकडून देण्यात आला. तीन वर्षे उलटूनही चित्रपटासंदर्भात काहीच हालचाली दिसत नसल्याने अनुदान म्हणून दिलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश त्याला देण्यात आले. २०१० साली लवाद स्थापन करून या प्रॉडक्शनच्या अजित सारंग याला नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांना जमीन महसूल कायद्यानुसार ही रक्कम वसूल करण्याबाबत सांगण्यात आले. मात्र सारंगकडे काहीच मालमत्ता नसल्याने यावर काही कारवाई करणे शक्य नव्हते.अखेर रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी २७ आॅगस्ट २०१५ रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक पोलीस ठाण्याबरोबरच गुन्हे शाखा कक्ष १चे सहायक पोलीस निरीक्षक विटकर यांच्या तपास पथकाने गुरुवारी नाशिकमधून सारंगच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)