शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाला लेट मार्क

By admin | Updated: June 18, 2016 01:40 IST

कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला लेट मार्क लागल्याचे समोर आले आहे. संपूर्ण दुहेरीकरणातील रोहा ते वीर या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून

मुंबई : कोकण रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला लेट मार्क लागल्याचे समोर आले आहे. संपूर्ण दुहेरीकरणातील रोहा ते वीर या पहिल्या टप्प्याचे काम मे महिन्यापासून सुरू होईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली होती. मात्र निविदेतच (टेंडर) काम अडकल्याने दुहेरीकरणाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. मध्य रेल्वेवरील पनवेल ते रोहा या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नागोठणे ते रोहा पट्ट्यातील अवघ्या १३ किलोमीटरचे काम बाकी असून ते २0१६ च्या अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. कोकण रेल्वेकडूनही कोलाड ते ठोकूरपर्यंत दुहेरीकरणाच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. रेल्वे अर्थसंकल्पात दुहेरीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर या मार्गावरील ७४१ किलोमीटरचे काम टप्प्याटप्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यातील रोहा ते वीर या ४७ किलोमीटरच्या अंतराच्या कामासाठी ८ नोव्हेंबर रोजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर कामासाठी निविदा काढण्यात आली. मात्र काही तांत्रिक अडचणी उद्भवल्याने निविदा प्रक्रीया लांबली. त्यानंतर या वर्षाच्या मे महिन्यापासून काम सुरु होईल, अशी माहिती कोकण रेल्वेकडूनच देण्यात आली होती. परंतु मे महिना उलटूनही त्या काम सुरू झालेले नाही. निविदेची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कोकण रेल्वेतील सूत्रांनी दिली. मात्र काम कधीपासून सुरु होईल याची निश्चित माहिती देण्यात आली नाही. (प्रतिनिधी)- संपूर्ण दुहेरीकरणासाठी जवळपास १0 ते ११ हजार कोटींचा खर्च आहे. - पहिल्या टप्प्यातील कामासाठी एकूण २९५ कोटी रुपये खर्च आहे.- पहिल्या टप्प्यासाठी एलआयसीकडून कोकण रेल्वेला सुमारे २५0 कोटींचे कर्ज मंजुर झाले आहे.- दुहेरीकरण झाल्यावर रोजच्या फेऱ्या ४५ वरुन ९0 वर जातील.- कोकण रेल्वेवरील दुहेरीकरणाचे काम हे टप्प्याटप्यात होणार आहे.कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरण करतानाच अकरा नवीन स्थानकांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्याबाबत कोकण रेल्वेने पाठवलेल्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळालेली आहे.