शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा लग्न लावल्यास पाच हजाराचा दंड !

By admin | Updated: January 12, 2016 01:37 IST

भावसार समाजाचे ‘समय के साथ चलो’ अभियान.

अनिल गवई /खामगाव (जि.बुलडाणा): गेल्या काही दिवसांपासून उशिरा लग्न लावण्याची प्रथाच पडली आहे. यामुळे वेळेवर लग्नासाठी पोहोचणार्‍या वर्‍हाड्यांसह नातेवाईक आणि मित्रमंडळीला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी भावसार समाज मंडळाने पुढाकार घेतला असून, यापुढे समाजामध्ये उशिरा लग्न लावणार्‍या वधू आणि वराकडील मंडळींना ५ हजारांचा दंड ठोठावण्याचा एकमुखी ठराव बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने रविवारी येथे घेतला. उशिरा लग्न लावण्याची प्रथा रूढ झाल्यामुळे अनेकदा बँड पथक, मंगल कार्यालय आणि तत्सम गोष्टींसाठी विहीत मुदतीत केलेल्या करारावरून तसेच वधू, वराकडील मंडळींमध्ये वादही उद्भवतात. या पृष्ठभूमिवर वेळेवर लग्न लावण्यासाठी एक आदर्श संहिताच महाराष्ट्र भावसार समाजाशी संलग्नीत असलेल्या बुलडाणा जिल्हा भावसार समाज मंडळाने तयार केली आहे. तसे विविध ठरावदेखील एकमुखाने संमत करीत या ठरावाची अंमलबजावणी १0 जानेवारीपासून सुरु केली आहे. उशिरा लग्न लावणार्‍या वधू आणि वराकडील मंडळींना प्रत्येकी अडीच हजार रुपये म्हणजेच दोन्ही पक्षांकडून पाच हजारांचा दंड भावसार समाज मंडळ वसूल करणार आहे. भावसार समाज मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन खामगावजवळ असलेल्या जनुना देवी येथे रविवारी पार पडले. या सभेला भावसार समाजाचे महाराष्ट्र तथा विदर्भातील नेते मंडळी मोठय़ासंख्येने उपस्थित होती. पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार ! वेळेवर लग्न लावण्यासोबतच पर्यावरण रक्षणासाठीही भावसार समाजाने पुढाकार घेतला आहे. समाजातील आदर्श आचार संहिता तयार करताना पर्यावरण रक्षणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विवाह सोहळा, व्रतवैकल्य, वाढदिवस, दशक्रिया विधी, तेरवी यासारख्या सामाजिक उपक्रमामध्ये प्लास्टीक पत्रवाळ्या, द्रोण सुध्दा न वापरण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. त्यामुळे प्लास्टीक द्रोण आणि पत्रावळी वापरल्यास २१00 रुपये दंड सुध्दा संबंधितांना भरावा लागणार आहे.