शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर विदर्भाच्या नंदनवनाने टाकली कात

By admin | Updated: August 10, 2014 01:27 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर उशिरा का होईना ‘निसर्गसौंदर्य’ फुलू लागले आहे. मुसळधार पाऊस, दाट धुके, उंच डोंगरावरून दऱ्याखोऱ्यांत कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.

नरेंद्र जावरे - चिखलदराविदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावर उशिरा का होईना ‘निसर्गसौंदर्य’ फुलू लागले आहे. मुसळधार पाऊस, दाट धुके, उंच डोंगरावरून दऱ्याखोऱ्यांत कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवसांत हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला असतो़ विदर्भाचे एकमेव नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वसलेल्या सेमाडोहसुद्धा पर्यटकांची गर्दी खेचत आहे. चिखलदरा पर्यटन स्थळावर इतिहासकालीन गाविलगड किल्ला, महाभारतकालीन भीमकुंड, एका सादाला प्रतिसाद देणारा पंचबोल, आदिवासींचे कुळदैवत, देवीपॉइंट येथील जनादेवीचे मंदिर, हरिकेन, मोझरी, सनसेट पॉइंट व नौकाविहार अशा प्रेक्षणीय स्थळांना हजारो पर्यटक भेट देऊन आनंद घेत आहेत. या वर्षी एप्रिल ते जुलै या काळात जवळपास २२ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. चिखलदरा पर्यटनाचा पॅकेज टूरसुद्धा मोठ्या प्रमाणात राज्यासह, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातून येणारे पर्यटक करतात. व्याघ्र प्रकल्प असलेल्या सेमाडोह पर्यटन स्थळासह जंगल सफारी व भव्य सिपना नदीच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरत नाही. पाऊस उशिरा पण जोराचा : सर्वत्र पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्याचा फटका चिखलदरा पर्यटन स्थळालासुद्धा बसला. ७ जूनपूर्वीच चिखलदरा पर्यटन स्थळावर हजेरी लावणारा वरुण राजा या वेळी मात्र रुसला. परंतु, काही दिवसांनी २४ तासांत तब्बल ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चिखलदरा पर्यटन स्थळ अप्पर आणि लोअर प्लेटो अशा दोन भागांत वसले आहे. येथील लोकसंख्या पाच हजार असून, राज्यातील ‘क’ वर्ग असलेली सर्वांत लहान नगर परिषद आहे. अप्पर प्लेटोवर आतापर्यंत ७९४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी १४११ मि.मी. एवढी होती.