शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना दिली गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका

By admin | Updated: November 21, 2014 02:26 IST

आॅक्टोबर परीक्षेचा गोंधळ बुधवारीही सुरूच राहिला. टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना ‘फायनान्स अकाउंटिंग’ या विषयाची गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका देऊन विद्यापीठाने गोंधळाची परिसीमाच गाठली.

मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या आॅक्टोबर परीक्षेचा गोंधळ बुधवारीही सुरूच राहिला. टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना ‘फायनान्स अकाउंटिंग’ या विषयाची गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका देऊन विद्यापीठाने गोंधळाची परिसीमाच गाठली. विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा केंद्रांवर हा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थ्यांकडून तक्रारी येताच विद्यापीठाने पेपर बदलून दिला. मात्र त्यामुळे परीक्षा तब्बल तासभर उशीराने सुरू झाली. विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाने आॅक्टोबर परीक्षा पुढे ढकलली होती. त्यामुळे बीए, बीकॉम आणि बीएस्सीच्या परीक्षा ५ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजता टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राची ‘फायनान्स अकाउंटिंग’ या विषयाची परीक्षा सुरू झाली. मात्र प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर त्या गेल्या वर्षीच्या असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आणि परीक्षा केंद्रांवर एकच गोंधळ उडाला. युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर प्र-कुलगुरूंनी चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याबद्दल सिनेट सदस्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महादेव जगताप यांनी विद्यापीठाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)