शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अखेरचे तीन तास..नाशिककरांनो मतदानासाठी बाहेर पडा !

By admin | Updated: February 21, 2017 18:52 IST

व्हॉटसअ‍ॅपवर भावनिक साद; टक्का पन्नाशीच्या पुढे

अझहर शेख : नाशिक : ‘नाशिककर पहिल्या सहा तासांत फक्त ३० टक्के मतदान झालयं? हा आकडा नाशिककरांच्या उत्साहाला शोभणारा नाही. यावेळी सर्वाधिक मतदान आपल्या नाशिकमधुन करायचयं ना? परंतु ठाणे, पुणे, अकोलासुध्दा आपल्या पुढे...तुम्हाला वाटत नाही का आपल्या नाशिकसाठी चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यावे? नाशिककरांनो बाहेर पडा, मतदान करा, पुढील पाच वर्षे संधी नाही...आपल्या नाशिकच्या प्रगतीसाठी आपण एवढे तर कराल ना..? लोकशाही सणाचा आनंद लुटा, हा संदेश पुढेही पाठवा.’ अशी भावनिक साद नाशिककरांनी व्हॉटस् अ‍ॅपवरून घातली.बहुसदस्सीय पध्दतीने राबविली जाणारी मतदान प्रक्रिया, नवीन प्रभाग रचना, मतदार याद्यांचा झालेला घोळ, उन्हाची तीव्रता, नावांची शोधाशोध, राहत्या परिसरापासून दूर अंतरावर असलेल्या मतदान केंद्रावर आलेले क्रमांक अशा एक ना अनेक कारणांमुळे नाशिककरांना मतदानाचा हक्क बजावताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती. याचा थेट परिणाम झाला तो मतदानाच्या टक्केवारीवर. पहिले सहा तास उलटूनदेखील केवळ तीस टक्के मतदान महापालिकेच्या निवडणूकीचे झाल्याने सर्वच जागरूक नेटीझन्सला धडकी भरली. त्यांनी तत्काळ व्हॉटस्अ‍ॅपचे हत्यार उपसले आणि त्यावर वरील मजकुराची पोस्ट तयार करून ती विविध ग्रूपमधून व्हायरल केली.

 

...अन् लागल्या लांबलचक रांगाया पोस्टचा सकारात्मक प्रभाव मतदारांवर पडला. बहुतांश लोकांनी मरगळ झटकून कंटाळा न करता थोडाफार मनस्ताप सहन करण्याची मनाची तयारी करून घराचा उंबरा ओलांडला.ज्या केंद्रांवर दुपारी दोन वाजेपर्यंत तुरळक गर्दी दिसून येत होती त्याच केंद्रांवर चार वाजेनंतर मतदारांनी लोकशाहीचा अधिकार आणि राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी केल्याने लांबलचक रांगा परिसरात दिसून येत होत्या. ---------मतदानाचा टक्का वाढण्यासाठी झाली मदतनाशिकच्या मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. त्यामुळे ज्या मतदारांनी मतदान केंद्राचा उंबरा साडेपाच वाजेपर्यंत ओलांडला त्या मतदारांना पोलीसांनी सहकार्य करत मतदान केंद्राच्या आतमध्ये रांगा लावण्यास सांगितले आणि मुख्य प्रवेशद्वार त्यांनतर बंद करुन घेतले. यावेळी देखील काही नागरिक ‘देर आयें पर दुरूस्त आयें...’ या हिंदीमधील म्हणीप्रमाणे मतदान केंद्रावर पोहचले खरे; मात्र मतदानाची वेळ संपल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आणि आपण मतदानाचा हक्क गमावल्याचे दु:खही चेहऱ्यांवर झळकले.