शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शहीद धनराज प्रभाकर मेश्राम यांना अखेरची मानवंदना

By admin | Updated: June 7, 2016 18:34 IST

केंद्रीय दारूगोळा भांडारात (सीएडी कॅम्प) झालेल्या भीषण अग्निस्फोटात वीरमरण आलेले शहिद धनराज प्रभाकर मेश्राम यांच्यावर मंगळवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार : हजारो शोकाकुल नागरिकांनी दिला अखेरचा निरोप नागपूर : केंद्रीय दारूगोळा भांडारात (सीएडी कॅम्प) झालेल्या भीषण अग्निस्फोटात वीरमरण आलेले शहिद धनराज प्रभाकर मेश्राम यांच्यावर मंगळवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी शहिद मेश्राम यांना हुंदके आवरत अखेरचा निरोप दिला. पुलगावच्या सीएडीत ३० मेच्या मघ्यरात्री भीषण अग्निस्फोट झाला. जानमालाची भयावह हानी टाळण्यासाठी कर्नल रंजीत पवार आणि मेजर के. मनोजकुमारसह एकूण १९ जणांनी स्वत:च्या प्राणाचे बलिदान दिले.

स्फोट एवढा भयंकर होता की त्यातील धनराज प्रभाकर मेश्राम (नागपूर), कुलदीपसिंग श्रीसंतलाल (हरियाणा), अरविंदकुमार पीडदान (भिवानी, हरियाणा), शेखर बाळस्कर (पिंपळा ता. आर्वी.), बाळू पाखरे (पुलगाव) आणि प्रमोद मेश्राम(पुलगाव) यांच्या देहाची अवस्था ओळखण्यापलिकडे झाली. त्यामुळे या सहा शहिदांची ओळख पटविण्यासाठी प्रशासनाने त्यांची नागपूरच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करवून घेतली. सोमवारी तसा अहवाल मिळाल्यानंतर सीएडी प्रशासनाने या शहिदांचे पार्थिव त्यांच्या परिवाराच्या स्वाधिन केले. त्यानुसार, शहिद धनराज मेश्राम यांचे पार्थिव सैन्यदलाच्या सजवलेल्या वाहनात त्यांच्या ओमनगरातील घरी आणण्यात आले. ही माहिती कळताच आपल्या लाडक्या सुपूत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोच्या संख्येत नागरिक शहिद मेश्राम यांच्या घरी पोहचले.

शहिद मेश्राम यांची पत्नी रोहिणी, त्यांची मुले आणि नातेवाईकांसह ठिकठिकाणांहून आलेल्या नातेवाईक आणि हजारो नागरिकांनी शहिद मेश्राम यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा नारा घाटाकडे निघाली. वाटेत ठिकठिकाणी त्यांच्यावर फुले उधळली जात होती. ह्यशहिद धनराज मेश्राम अमर रहेह्णच्या घोषणाही दिल्या जात होत्या. नारा घाटावर शहिद मेश्राम यांच्या सहका-यांनी त्यांच्या दिलेरीच्या आठवणी सांगितल्या. त्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना अग्नी दिला. यावेळी जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून शहिद मेश्राम यांना अखेरची मानवंदना दिली. --वीर पतीचा अभिमान : वीरपत्नी रोहिणी मेश्रामदेशाच्या आणि नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याचे पाहून आपल्या पतीने स्वत:चे बलिदान दिले. त्यांच्या जाण्याचे दु:ख शब्दातीत असले तरी त्यांच्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे. माझी दोन्ही मुले देशसेवेसाठी सैन्यात भरती करेन, अशी प्रतिक्रिया शहिद मेश्राम यांच्या वीरपत्नी रोहिणी धनराज मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.