शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

शहीद जवान सावन माने यांना अखेरचा निरोप

By admin | Updated: June 25, 2017 01:43 IST

जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना शहीद झालेले जवान सावन बाळकू माने यांच्यावर शनिवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी गोगवे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना शहीद झालेले जवान सावन बाळकू माने यांच्यावर शनिवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी गोगवे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील जनसागर लोटला होता. माने हे २८ मार्च २०१३ रोजी मराठा बटालियन, बेळगाव येथे भरती झाले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम अहमदाबाद येथे तीन वर्षे कार्यरत होते. त्यांची पाच-सहा महिन्यांपूर्र्वी जम्मू-काश्मीर येथे बदली झाली होती.लष्करी वाहनातून तिरंग्यात लपेटलेले त्यांचे पार्थिव सकाळी घरी आणण्यात आले. या वेळी त्यांची आई शोभा, वडील बाळकू, भाऊ सागर माने, बहीण रेश्मा कदम या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यानंतर, सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अंत्ययात्रा काढण्यात आली. पंचक्रोशीतील प्रत्येक चौकात ‘सावन माने अमर रहे...’ ‘वीर जवान, तुझे सलाम’ अशा घोषणांचे बॅनर्स लावण्यात आले होते. लष्करी परंपरा...गोगवे गावची लोकसंख्या तीन हजार आहे. गावातील ११२ जण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. ६० जण माजी सैनिक आहेत. माने यांच्या घराण्यालासुद्धा लष्करी परंपरा आहे. सावन माने यांचे वडील बाळकू हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत, तर थोरले भाऊ सागर हे सध्या आसाम येथे सैन्यदलात कार्यरत आहेत. सावन यांची बहीण रेश्मा यांचे पतीसुद्धा सैन्यदलात आहेत.पंचक्रोशीतील सर्व व्यवहार बंदसावन यांचे पार्थिव बांबवडे गावात शनिवारी आणले जाणार, म्हणून बांबवडेसह आसपासच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी वर्गानेही संपूर्ण दिवसभर ‘बंद’ ठेवून आपल्या लाडक्या सुपुत्राला आदरांजली वाहिली. यांनी वाहिली आदरांजलीसामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, १०९ इन्फट्री बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल आर. एस. लेहल, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.