शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदान चिठ्ठ्यांचे वाटप अंतिम टप्प्यात

By admin | Updated: February 18, 2017 19:55 IST

मतदार यादीनुसार मतदान चिठ्ठ्यांचे वाटप बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येत असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.

मतदारांच्या सोयीसाठी 'एन्ड्रॉईड ऍप व संकेतस्थळ' कार्यान्वित, मतदाराच्या नावाने शोधता येणार मतदान केंद्र !
 
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ -  येत्या २१ फेब्रुवारी २०१७ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. भारत निवडणूक आयोगाच्या दि. ५ जानेवारी २०१७ च्या मतदार यादीमध्ये ज्यांची नावे असतील त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या मतदार यादीनुसार मतदान चिठ्ठ्यांचे वाटप बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येत असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण मतदार यादी ही महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर https://localbodyvoterlist.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदाराच्या नावाच्या आधारे मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांनी दिली आहे.
याशिवाय मतदारांनी कुठे व कोणत्या मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी जावे? ही माहिती शोधणे सुलभ होण्याच्या दृष्टीने 'True Voter' हे ऍन्ड्राईड ऍप देखील राज्य निवडणूक आयोगाद्वारे तयार करण्यात आले आहे. तसेच एका खाजगी संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आलेले 'https://operationblackdot.in' हे संकेतस्थळ देखील मतदारांच्या सुविधेसाठी उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर देखील मतदाराच्या नावाच्या आधारे मतदान केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे.
वर्ष २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान मतदानासाठी १ हजार ४५२ ठिकाणी मतदान केंद्रे होती. या निवडणुकीत १०८ मतदान केंद्रे ही नव्याने झाली आहेत. यानुसार यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १ हजार ५६० ठिकाणी ७ हजार ३०४ मतदान केंद्रे आहेत. तसेच यावेळी प्रभाग रचना व प्रभाग सीमा देखील बदलल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी गेल्या निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान केले असेल, त्याच ठिकाणी यावेळी मतदान केंद्र असेलच असे नाही. ही बाब लक्षात घेता मतदारांनी आपले मतदान केंद्र कुठे आहे याची खातरजमा मतदान चिठ्ठीच्या आधारे अथवा संबंधित संकेतस्थळाद्वारे किंवा ऍन्ड्रॉईड ऍप द्वारे करावी, असेही अतिरिक्त आयुक्त देशमुख यांनी नमूद केले आहे.
'True Voter' या ऍन्ड्राईड ऍपच्या मदतीने मतदाराला आपल्या नावाच्या आधारे किंवा मतदार क्रमांकाच्या आधारे मतदान केंद्र शोधता येणार आहे. विशेष म्हणजे हे ऍप जीपीएस सुविधेला जाडलेले असल्याने या ऍपच्या आधारे मतदाराला मतदान केंद्रावर जाण्याचा मार्ग देखील समजू शकणार आहे. हे ऍप 'गुगल प्ले स्टोअर' वरती मोफत उपलब्ध आहे.