शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन रेल्वे बोगदा मोजतोय अखेरची घटका

By admin | Updated: August 23, 2016 05:52 IST

१६० वर्षांपूर्वीच्या रेल्वे बोगद्याकडे मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना घडून अनेक प्रवाशांचे जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

आसनगाव : महाड येथील दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने ब्रिटिशकालीन पुलांचे पाहणीसत्र सुरू केले असले तरी वासिंद रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या १६० वर्षांपूर्वीच्या रेल्वे बोगद्याकडे मात्र रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मोठी दुर्घटना घडून अनेक प्रवाशांचे जीव जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या बोगद्यावरून दररोज शेकडो लोकल व एक्स्प्रेस गाड्या जात असल्याने स्थानिकांनी भीती व्यक्त करत आहे. हा रेल्वेमार्ग ब्रिटिशांनी १८५४ मध्ये तयार केला. त्यानंतर, १८५५ ला पहिली रेल्वे वासिंद रेल्वे स्थानकात आली होती. रेल्वेमार्गावरील पाणी वाहून जाण्यासाठी हा बोगदा तयार केला. तथापि, मुरबाड, कल्याण तालुक्याला जोडणारे वासिंद स्थानकाबाहेरील रेल्वेमार्गावरील फाटक ( क्र . ६२ ) २२ वर्षांपूर्वी बंद केल्याने रस्त्यावरील वाहतूक पुढे याच बोगद्यातून वळवण्यात आली. आजही या बोगद्यातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्यांच्यादेखील जीवाला धोका आहे. २००२ मध्ये या बोगद्याच्या आतील काही भाग पडला होता. त्या वेळेस तेथे सिमेंट व दगडाचा तात्पुरता लेप लावण्यात आला होता. आजही संपूर्ण वासिंद शहराचे सांडपाणी याच बोगद्यावाटे बाहेर पडत असल्याने त्याची जमिनीखालील बाजू कमकुवत झाली आहे. तसेच वरील बाजूनेही गळती सुरू आहे. काही ठिकाणी बांधकामाचे दगडदेखील पडले आहेत. या बोगद्याच्या वरील भागातून रेल्वे, तर खालील भागातून रस्ते वाहतूक सुरू असल्याने हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे ६२ क्रमांकाचे रेल्वेचे फाटक पुन्हा सुरू करून रस्ते वाहतूक सुरू करण्याची मागणी आहे.