दांडगुरी : श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन-दिघी मार्गावरील दांडगुरी येथील ब्रिटिशकालीन दुर्बल पूल मोजतोय अखेरची घटका, शंभर वर्षे उलटूनही ब्रिटिशकालीन पुलाच्या बांधकामानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कोणतीही देखभाल अथवा डागडुजीकरण अद्याप करण्यात आलेले नाही.रायगड जिल्ह्यातील मुंबई - गोवा मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल हा देखील ज्या अवस्थेत हा पूल कोसळून दुर्घटना झाली हे ब्रिटिशकालीन पूल त्याच वेळेस उभारण्यात आले जर का या ब्रिटिशकालीन पुलाची डागडुजी वेळीच केली असती तर हा प्रसंग ओढवला नसता. तर दांडगुरी येथील ब्रिटिशकालीन पुलाच्या शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे या पुलाचा ठेका महाड येथील ठेकेदार बुटाला यांना देण्यात आला. परंतु नव्याने पूल उभारताना या ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे तोडून त्यातील दगडाचा उपयोग नवीन पूल उभारतात ठेकेदार बुटाला यांनी केला. यामुळे या ब्रिटिशकालीन पुलाला धोका निर्माण झाला असून संबंधित ठेकेदार बुटाला यांच्यावर ठोस करवाई करून बुटाला यांना काळ्या यादीत टाकण्यात यावी, अशी मागणी दांडगुरी पंचक्र ोशीतून होत आहे तर सदर ब्रिटिश कालीन पूल या पुलावरु न प्रवास करते वेळीस अपघात होऊ शकतो तर नव्याने बांधण्यात आलेला पूल हा अंदाजे दोन ते तीन फूट खचल्याने गाडी चालक मालकांना या पुलावरून प्रवास करते वेळीस जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून यामुळे ठेकेदार बुटाला व संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी येथील ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे समजते.>ठेकेदारावर कारवाईची मागणी दांडगुरी येथील ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे तोडून ठेकेदार यांनी त्यातील नवीन पूल बांधण्याकरिता दगड वापरला तर नवीन पूल देखील खचला असून ब्रिटिशकालीन पुलावरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नव्याने पूल उभारताना ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे तोडून त्यातील दगडाचा उपयोग नवीन पूल उभारताना ठेकेदार बुटाला यांनी केला. यामुळे या ब्रिटिशकालीन पुलाला धोका निर्माण झाला असून संबंधित ठेकेदारावर ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दांडगुरीतील पूल मोजतोय अखेरची घटका
By admin | Updated: August 5, 2016 02:35 IST