शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘बदली रद्द’साठी इच्छुक पोलिसांना अखेरची संधी

By admin | Updated: July 13, 2015 01:33 IST

कौटुंबिक, वैद्यकीय कारणामुळे नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यास असमर्थ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपली अडचण थेट पोलीस महासंचालक संजीव दयाळ

मुंबई: कौटुंबिक, वैद्यकीय कारणामुळे नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यास असमर्थ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना आपली अडचण थेट पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना सांगण्याची संधी मिळाली आहे. ज्यांच्या समस्या रास्त आहेत त्यांची बदली रद्द होऊन त्यांची सोईच्या ठिकाणी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.उद्या (सोमवारी) व मंगळवारी दोन टप्प्यांत ओआर कक्षात येथे गाऱ्हाणी मांडता येणार आहेत. पोलीस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. या पूर्वी भेटलेल्यांना मात्र यात सहभागी होेता येणार नाही. सुमारे १५०वर अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास अनुत्सुक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरवर्षी मे व जून महिन्यात सुमारे ६०० च्या वर पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या (जनरल गॅझेट) झाल्या आहेत. एकच आयुक्तालय / जिल्ह्यात सहा वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्यांच्या त्यात समावेश आहे. यापैकी बहुतांश जण नियुक्तीच्या ठिकाणी हजर असलेतरी अनेक जण वैयक्तिक अडचणींमुळे त्या ठिकाणी गेलेले नाहीत. (प्रतिनिधी)अनेक जण आजारपणाच्या रजेवरत्यात प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून विदर्भ व नक्षलग्रस्त भागात बदली झालेल्यांचा समावेश आहे. स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांचे आजारपण, पाल्यांच्या शिक्षणाचे प्रश्न आदी प्रमुख अडचणी असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अनेक जण हजर होण्याऐवजी आजारपणाच्या रजेवर गेले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे महासंचालक दयाळ यांनी ठरविले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आयुक्तालय व कोकण परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. तर मंगळवारी औरंगाबाद, अमरावती, नागपूर आयुक्तालये कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, अमरावती परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.