शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

राज्यात महामार्गांचा मोठा विस्तार

By admin | Updated: November 6, 2015 01:32 IST

महाराष्ट्रातील ३८३९ किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिलेली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ३८३९ किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिलेली आहे. या सोबतच नागपूर-मुंबई दरम्यानच्या प्रस्तावित सहा पदरी एक्सप्रेस वेसाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांनी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे, तसेच प्रस्तावित चौपदरी मुंबई-गोवा एक्सप्रेस मार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या मार्गातील अडचणीही दूर झाल्या आहेत.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम, सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यासाठी गडकरी यांनी स्वत: पुढाकार घेतला होता. या संदर्भातील आदेश पुढच्या आठवड्यात जारी केला जाईल. या निर्णयामुळे ३८३९ किलोमीटरच्या रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे असेल आणि राज्य सरकारला त्यासाठी खर्च करावा लागणार नाही. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या महामार्गांच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. सध्या महाराष्ट्रात ७०३५ किलोमीटर लांबीचे राज्य महामार्ग व ३५७५४ किलोमीटरचे सामान्य महामार्ग आहेत.मुंबई-गोवा कोस्टल रोडमुंबई आणि गोवादरम्यान कोस्टल रोड बनविण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मार्गावर अंदाजे २००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या शिवाय मुंबई आणि बडोदादरम्यान सहा पदरी एक्सप्रेस वेसाठी लवकरच विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.१० हजार कोटींचे रस्ता प्रकल्प‘पुढील महिन्यात आमचे सरकार १० हजार कोटींचे रस्ते प्रकल्प घोषित करण्याची शक्यता आहे,’ असे सांगून पाटील म्हणाले, ‘यावर्षी राज्याला केंद्राकडून केंद्रीय रस्ता निधीमधून ४०३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आधी केवळ २०० कोटी मिळायचे, परंतु आमच्या सरकारने रस्त्यांसाठी २८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद वाढवून, ती ३७०० कोटी रुपये केली आहे. त्यामुळे राज्यातील रस्त्यांच्या स्थितीत लवकरच सुधारणा होईल.’नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वे : लवकरच डीपीआरनागपूर-मुंबई एक्स्प्रेस वेसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या करारानुसार, दोन महिन्यांच्या आत विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सध्या ३२ हजार कोटी रुपये आहे. पुढील साडेतीन ते चार वर्षांत हा मार्ग तयार करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.मुंबई-गोवा एक्स्प्रेस वेमुंबई-गोवा चौपदरी एक्सप्रेस वेसाठी रायगड जिल्ह्याच्या पनवेल आणि इंदापूरदरम्यानची जमीन अधिग्रहित करण्याच्या मार्गात ज्या अडचणी येत होत्या, त्या आता दूर झाल्या आहेत. सर्व प्रकारच्या मंजुरी मिळालेल्या आहेत. त्यामुळे इंदापूर आणि झारपदरम्यान काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील या महामार्गासाठी ५० टक्के जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.