शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

ड्रग्ज प्रकरणामागे मोठे रॅकेट?

By admin | Updated: December 24, 2015 00:28 IST

गोव्याशी कनेक्शन : दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग

वैभव साळकर- दोडामार्ग --केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी रात्री दोडामार्गमध्ये अमली पदार्थ विक्री विरोधात केलेल्या धडक कारवाईमुळे दोडामार्ग तालुक्याचे गोवा राज्याशी चर्चेत असलेले ड्रग्स कनेक्शन उघड झाले आहे. यापूर्वी गांजासारख्या अमली पदार्थांची लागवड तिलारीच्या बुडीत क्षेत्राबाहेर आढळून आल्याने ड्रग्स माफियांच्या कारवायांमुळे दोडामार्ग तालुका चर्चेत होता. मात्र, आता गांजासोबत रेव्ह पार्ट्यांमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या ड्रग्सचाही पुरवठा तालुक्यातून होत असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, या कारवाईत पकडण्यात आलेले संशयीत हे केवळ प्यादे असून, त्यांचा म्होरक्या मात्र अद्याप मोकाटच आहे. या संपूर्ण प्रकरणात तालुक्यातील काही युवकांचा सहभाग असल्याची जोरदार चर्चा आहे.गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर दोडामार्ग तालुका वसला आहे. त्यामुळे या तालुक्याचा बराचसा संपर्क हा गोवा आणि कर्नाटकशी येतो. अनेक व्यवहार या दोन राज्यातील लोकांशी मोठ्या प्रमाणात केले जातात. डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्याने याठिकाणी गुन्हेगारी कारवाया देखील मोठ्या प्रमाणावर होत असतात. या भागात ड्रग्सची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुढे येत आहे.त्यामुळे दोडामार्ग तालुका हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मंगळवारी रात्री केंद्रीय अमली पदार्थ विरोधी गोवा विभागीय कार्यालयाच्या पथकाने अमली पदार्थाची विक्री करताना दोघा संशयितांना रंगेहात पकडल्याने पुन्हा एकदा तालुका चर्चेत आला असून, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.अंमली पदार्थाच्या तस्करीवरून दोडामार्ग तालुका यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. साधारण: आठ वर्षांपूर्वी तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेर करण्यात आलेली गांजा लागवड पकडून पोलिसांनी त्यावेळी काही परप्रांतीयांना अटक केली होती. तेव्हापासून अमली पदार्थ खरेदी व्यवहाराचे दोडामार्ग तालुका हा केंद्रबिंदू करण्याचा प्रयत्न या अमली पदार्थ खरेदी-विक्रीत गुंतलेल्या लोकांकडून करण्यात येत आहे. तिलारीच्या बुडीत क्षेत्राबाहेर आजही परप्रांतीयांकडून गांजासारख्या वनस्पतींची लागवड केली जात असल्याचा आरोप झाला आहे. पण स्थानिक पोलीस मात्र त्याकडे कानाडोळा करत आहेत. गोव्यात कडेकोट बंदोबस्त असल्याने त्याठिकाणी अमली पदार्थ व्यवहार करताना मोठी खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे यात धोका मोठा असतो. मात्र, दोडामार्ग तालुक्यात असे व्यवहार बिनबोभाटपणे करता येतात. परिणामी सुरक्षित ठिकाण म्हणून दोडामार्गकडे गोव्यातील ड्रग्स माफियांचा डोळा आहे. हे काम करण्यासाठी स्थानिक युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्याचे काम हे माफिया करत आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या कारवाईमधून हे सत्य समोर आले असून, स्थानिक पोलीस प्रशासनाने मात्र आता यापुढे सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा ड्रग्सचे जाळे आणखीनच वाढत जाणार आहे.गांजाची लागवड : धडक मोहीम राबवावीजिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देतील काय?दोडामार्ग तालुक्यात तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेर यापूर्वी मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळून आली होती. आजही अशी अमली पदार्थांची लागवड केली जाते, असा आरोप आहे. मात्र, स्थानिक पोलीस त्याकडे कानाडोळा करतात. निदान आता तरी दोडामार्ग तालुका ड्रग्ज माफियांसाठी खरेदी-विक्रीचे केंद्र बनू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे आणि धडक मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. गोव्याच्या सीमावर्ती भागाला विळखागोव्याच्या सीमावर्ती भागात ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याची चर्चा आहे. केरी-गोवा, पर्ये त्याचबरोबर दोडामार्ग तालुक्याच्या काही भागात हे प्रकार चालतात, अशी जोरदार चर्चा आता सुरू आहे.