मुंबई : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संगणकीकृत सातबारा उतारे आणि फेरफारनोंदीचे काम ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करावे. तसेच सर्व तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी द्यावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. पाटील यांनी आज सर्व विभागीय महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
तलाठ्यांना मिळणार लॅपटॉप, प्रिंटर
By admin | Updated: November 8, 2016 04:17 IST