शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लॅपटॉप चोर रिक्षाचालकाला अटक

By admin | Updated: March 2, 2017 02:11 IST

एका १७ वर्षीय मुलाचा लॅपटॉप चोरणाऱ्या रिक्षाचालकाला दहिसर पोलिसांनी शनिवारी अटक केली.

मुंबई : एका १७ वर्षीय मुलाचा लॅपटॉप चोरणाऱ्या रिक्षाचालकाला दहिसर पोलिसांनी शनिवारी अटक केली. मुख्य म्हणजे कोणताही क्लू नसताना रिक्षामागे लिहिलेल्या ‘समीर’ या नावाचा शोध घेत पोलिसांनी हे यश मिळवले आणि चोरीला गेलेला लॅपटॉपदेखील परत मिळवला.अजय शुक्ला (४५) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. अजय नालासोपारा येथील राहणारा आहे. दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंशू व्यंकटेशन (१७) हा विद्यार्थी इयत्ता अकरावीत कांदिवलीच्या कॉलेजमध्ये शिकतो. १४ फेब्रुवारी रोजी त्याची बस सुटल्याने वांद्रे येथील घरी जाण्यासाठी त्याने ठाकूर मॉलच्या गेटवरून रिक्षा पकडली. तहान लागल्याने रिक्षा मध्येच थांबवून तो एका दुकानात पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेला. त्या वेळी त्याच्याकडचा लॅपटॉप त्याने रिक्षातच ठेवला. तो रिक्षातून उतरताक्षणीच शुक्ला रिक्षा घेऊन पसार झाला. हा प्रकार दहिसर पोलिसांच्या हद्दीत घडला. त्यानुसार अंशूने दहिसर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राकेश पवार हे तपास करीत होते. अंशूने रिक्षाचा नंबर लक्षात नसल्याचे सांगितले तरी रिक्षाच्या मागे समीर लिहिले होते, अशी माहिती त्याने दिली. त्यानुसार पवार यांच्या पथकाने अनेक रिक्षा पार्किंग पिंजून काढत ‘समीर’ नाव लिहिलेल्या चार ते पाच रिक्षाचालकांना ताब्यात घेतले. ज्यात शुक्लाचाही समावेश होता. त्यास अंशूने ओळखले. शुक्लाने गुन्हा कबूल करत नालासोपाऱ्याच्या घरात ठेवलेला सुमारे ९० हजारांचा लॅपटॉप परत आणून दिला. शुक्लाला पोलिसांनी अटक केली. त्याला स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)