शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सिडको कार्यालयातून लॅपटॉप लंपास

By admin | Updated: September 10, 2015 02:41 IST

राज्यातले आर्थिकदृष्ट्या सक्षम महामंडळ असलेल्या सिडको कार्यालयात मंगळवारी मध्यरात्री चोरी झाली. त्यामध्ये ५ हजार रुपयांची रक्कम व तीन लॅपटॉप चोरीला गेले आहेत.

नवी मुंबई : राज्यातले आर्थिकदृष्ट्या सक्षम महामंडळ असलेल्या सिडको कार्यालयात मंगळवारी मध्यरात्री चोरी झाली. त्यामध्ये ५ हजार रुपयांची रक्कम व तीन लॅपटॉप चोरीला गेले आहेत. या चोरट्याने सिडको इमारतीमधील तीन मजल्यांवरील कार्यालयांमध्ये चोरीचा प्रयत्न केला आहे.मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल असलेल्या सिडको कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. दिवसा चोख बंदोबस्त असणारे सिडकोचे कार्यालय रात्री मात्र रामभरोसे असल्याचे एकट्या चोरट्याने उघड करून दिले आहे. सिडको भवनमधील नूतनीकरण सुरू असलेल्या कँटीनच्या खिडकीतून हा चोर घुसला. त्याने कँटीनच्या गल्ल्यातील ५ हजार रुपये चोरले. यानंतर लगतच्याच संगणक विभागाचा दरवाजा तोडून आतमधील तीन लॅपटॉप चोरले. हे अधिकाऱ्यांचे खासगी लॅपटॉप आहेत. यानंतर हा चोरटा थेट सिडको कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर पोचला. त्याठिकाणी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, सहव्यवस्थापकीय संचालिका, मुख्य दक्षता अधिकारी व जनसंपर्क अधिकाऱ्यांची दालने आहेत. रात्री कार्यालय वाऱ्यावर असल्याचे हेरून चोरट्याने जनसंपर्क अधिकाऱ्याच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने हत्याराने दरवाजाचे लॉक तोडण्याचाही प्रयत्न केला. परंतु अपयश आल्याने हा चोरटा थेट पाचव्या मजल्यावर गेला. तिथे अकाऊंट विभागात घुसून तिथेही चोरी करण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला. अखेर काही केल्या दरवाजा न उघडल्याने हाती लागले त्यातच समाधान मानत हा चोरटा आल्यामार्गे परत गेला. (प्रतिनिधी)-बुधवारी सकाळी सिडको भवनमध्ये अधिकाऱ्यांची हजेरी लागताच चोरीचा प्रकार उघड झाला. त्यानुसार या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -हा चोरटा एकटाच असून, तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी सांगितले.