शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागात दडी

By admin | Updated: June 30, 2016 01:42 IST

पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

काऱ्हाटी : पावसाने ओढ दिल्याने जिरायती भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवायचा, व जिवापाड सांभाळलेली जनावरे कशी वाचवायची, या विचाराने शेतकरी चिंतेत पडला आहे. पावसाळ्यातच ‘जनाई-शिरसाई’ योजनेतून बंधारे, पाझर तलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.हमखास समजला जाणारा खरीप हंगाम काऱ्हाटी, माळवाडी, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, फोंडवाडा, देऊळगाव रसाळ भागात वाया गेला आहे. तसेच, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा, जनावरांचा चारा कसा घ्यायचा, याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. शेतकरी सगळीकडून आर्थिक अडचणीत सापडला आहे. बारामतीच्या पश्चिम भागातील अांबी, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी, फोंडवाडा, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, लोणकरमळा, अंजनगाव, कऱ्हावागज, नेपत वळण, बऱ्हाणपूर भागात कऱ्हा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत.>मेंढपाळांसाठी घर कोसो दूरलोणी भापकर : पावसाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही बारामती तालुक्याचा ग्रामीण भाग अद्याप कोरडाच आहे. त्यातही तालुक्याच्या जिरायती भागातील पाणी आणि चाऱ्याची स्थिती अत्यंत दयनीय झाल्याचे चित्र आहे. पावसाने दडी मारल्याने सहा महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या येथील मेंढपाळवर्गासाठी अद्याप गाव आणि घर कोसो दूरच आहे. त्यामुळे सध्या अनेक मेंढपाळ बारामती शहाराच्या सभोवताली पालं टाकून पर्जन्यराजाची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येते. बारामती तालुक्यातील उत्तर-पश्चिम पट्ट्यातील जोगवडी, पळशी, मोराळवाडी, मोढवे, मुर्टी, कानाडवाडी, लोखंडवाडी, सस्तेवाडी, मुढाळे, मासाळवाडी, तर सुपे परगण्यातील बाबुर्डी, पानसरेवाडी, दंडवाडी, वढाणे या भागातील अनेक कुटुंबे शेळी-मेंढीपालन व्यवसायात आहेत. क्षारयुक्त पाणीपाऊस पडत नसल्याने घोर लागला आहे. जनावरांसाठी चारा पिके घेता आली नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चांगले पाणी नसल्यामुळे क्षारयुक्त पाणी जनावरांना पाजावे लागत आहे. परिणामी दूध उत्पादनात घट झाली आहे. खरीप हंगाम वाया गेल्यामुळे सलग चौथ्या वर्षीही दुष्काळ पडला आहे. सततची पाणी टंचाई व दुष्काळ, या भागातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजला असल्याची खंत शेतकरी लालासो भोसले व भाऊसाहेब पिसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.