शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 46 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 07:02 IST

दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला.

शिमला : ढगफुटीनंतर झालेल्या भूस्खलनात हिमाचल प्रदेशमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरून जाणा-या राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला. रात्री उशीरापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरू होते. बेपत्ता असलेल्यांची संख्या मोठी असल्याने मृतांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात झालेल्या जीवित हानीबद्दल वेदना झाल्याचे टिष्ट्वटरवर म्हटले.दरडी कोसळल्या व त्यामुळे मंडी-पठाणकोट राष्ट्रीय महामार्ग १५४ च्या कोत्रुपी खेड्यातील १०० मीटर भागाची हानी झाली. या महामार्गावरून एक बस मनाली येथून कटरा तर दुसरी चांभा येथून मनालीला निघाली होती. या दोन्ही बस हिमाचल प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या होत्या. दरडी कोसळल्यामुळे रस्ता वाहून गेला व त्यामुळे बसगाड्या ८०० मीटर खोल दरीत कोसळल्या. एक बस तर दरडीखाली पूर्णपणे गाडली गेल्यामुळे तिचा रात्री उशीरापर्यंत शोध लागला नव्हता. या बसमध्ये तब्बल ५० प्रवासी होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी अधिकाºयांसह घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले की, सर्वांना बाहेर काढेपर्यंत मदतकार्य सुरू राहील. पाच जखमींना मंडी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. (वृत्तसंस्था)।मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आरोग्यमंत्री कौल सिंग ठाकूर, परिवहन मंत्री जीएस बाली आणि ग्रामविकास मंत्री अनिल शर्मा यांनीही घटनास्थळी भेट दिली. आरोग्यमंत्री ठाकूर यांनी मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर परिवहन मंत्र्यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.>४५ मृतदेह बाहेर काढण्यात यशरात्री उशिरापर्यंत मनालीकडे जाणाºया बसमधून ४२ तर कटराकडे जाणाºया बसमधून तीन मृतदेह असे ४५ मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. त्यापैकी २३ मृतदेहांची ओळख पटली आहे. त्यात सनी कुमार या बाइकरचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.>250मीटरचा संपूर्ण परिसर मलब्याखाली गाडला गेला असून, त्यात दोन वाहने आणि अनेक घरे अडकली आहेत. त्यात अनेक जण गाडले गेले असण्याची भीती आहे. महामार्ग बंद करण्यात आला आहे.